Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जनता पार्टी माढा तालुका पूर्वच्या वतीने राष्ट्रीय किसान दिनानिमित्त तालुक्यातील 75 शेतकऱ्यांचा विशेष सन्मान

चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर:-मोडनिंब ता.माढा येथील हॉटेल कल्पतरू येथे भारतीय जनता पार्टी माढा तालुका यांचे वतीने राष्ट्रीय किसान दिवसाच्या निमित्ताने शेती क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 75 शेतकऱ्यांचा मानाचा फेटा, शाल, हार, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात शेती क्षेत्रामध्ये विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी आपले विचार मांडले यामध्ये प्रामुख्याने १९७८ पासुन द्राक्षे मध्ये विक्रमी उत्पादन घेणारे कषीभुषण देविदास मोरे यांनी आपले विचार मांडले डाळिंब उत्पादक शेतकरी प्रविण माने यांनी डाळिंब पिकाविषयी मागदर्शन केले. यामध्ये तुर, केळी ,द्राक्षे, डाळिंब, बोर, कांदा, ऊस इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ७५ शेतकर्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कृषीतज्ञ मनोज शहा, प्राध्यापक प्रशांत कुंभार सर यांनी मार्गदर्शन केले.
 भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष योगेश पाटील यांनी शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना उपस्थित शेतकऱ्यांना समजावून सांगितल्या. भारतीय जनता पार्टीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असा विश्वास तालुकाध्यक्ष योगेश पाटील यांनी शेतकऱ्यांना देण्यात आला. 
यावेळी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे यांनी आपल्या मनोगतात दोन तीन वर्षीतुन महाराष्ट्र शासनातर्फे कृषी भूषण व इतर पुरस्कार शेतकर्यांना देण्यात येतात. प्रत्येक वर्षी पुरस्काराने शेतकऱ्यांना सन्मानित करावे अशी मागणी मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले. 
तसेच हे राज्य सरकार व केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी( PM किसान,नमो, गोपीनाथराव मुंडे अपघात विमा योजने मार्फत शेतकऱ्यांना मदत केली जाते अतिशय खंबीरपणे हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी माढा तालुकाध्यक्ष श्री योगेश पाटील, राज्य परिषद सदस्य दत्तात्रय जाधव, सरचिटणीस धनाजी लादे, किसान मोर्चा माढा तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे, रविकांत जाधव ॲड. गणेश सुर्वे, विवेक कुंमभेकर, शहाजी यादव, प्रताप व्यवहारे, सतीश लोंढे, पांडुरंग राऊत, नावजी अनभुले, शहाजी भांगे, आप्पासाहेब झाडबुके, पितांबर लेंढवे मेजर, अमोल काटकर, सावता वाघमारे, सचिन शिंदे, रोहन शिंदे तसेच तालुक्यातील विविध पिकांमधील प्रगतशील शेतकरी भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या