चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : अखिल भारतीय ग्राहक समिती भद्रावतीची साप्ताहिक बैठक शहरातील गुरुनगर येथे सपन्ना झाली.
या बैठकीत भद्रावती नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांच्याकडून शहराच्या विकासाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. स्तकाराला ऊत्तर देताना चटकी यांनी भद्रावती शहराचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. बैठकीला अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे वामन नामपल्लीवार,वसंत वराटे, गोपाल घुमे,मोहन पवार, गुलाब लोणारे, शेखर घुमे, बालाजी दांडेकर, अतुल कोल्हे, बाळा कुटेमाटे, सौ. करुणा मोघे, सौ. मायाताई नारळे, शीला आगलावे, शीला चामाटे, सौ. लीला ढवळे, सौ. गीता जयपूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.


0 टिप्पण्या