चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी:—उदगीर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या हंडरगुळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र संचलित उप केंद्राकडे संबंधित खाते जाणुनबुजुन दुर्लक्ष करत असल्याने विविध गैर सोयींसह चिखल,घाण यांच्या विळख्यात सापडल्याचे दिसते.तसेच या उपकेंद्रात नियुक्तीवर असलेले कर्मचारी सतत गैरहजर असतात. अशी चर्चा परिसरातील नागरीकांत होत आहे.
१५ वर्षापुर्वी लाखो रुपये खर्चून शेळी,मेंढी बाजारच्या मैदानावर सर्व सोयीसुविधांनियुक्त असलेले आरोग्य उपकेंद्र उभारले.पण उभारणीपासुन ते आजवर तेथे कुणीच नित्यनेमाने ड्यूटी केल्याचे तसेच वरिष्ठाने पण भेट दिल्याचे कुणालाही आठवत नाही.वाढवणा बू.येथील सरकारी दवाखान्याचा चार्ज ज्या डाॅक्टरकडे तोच येथील आरोग्र केंद्राचा इंचार्ज आहे.माञ हा डाॅक्टर प्रत्यक्षात नव्हे तर फोनवरुन (शेळ्या) कारभार हाकत असल्याने येथील उपकेंद्रात व मेन केंद्रात विविध समस्या निर्माण झाल्याअसून उपकेंद्राच्या मेनगेटवर तसेच आजुबाजुला घाण पाण्याचा डोह (डबके) कायमस्वरुपी साचलेले दिसते.आणि याची दुर्गंधी व डासं दुर दुरवर पसरत असतात.तरीही या सर्व गंभीर विषयाकडे कुणीच लक्ष देईना म्हणुन या उपकेंद्रात राञंदिवस नको ते खेळ चालत असल्याची चर्चा आहे तेंव्हा या ठिकाणी एकदातरी जिल्हा सी.ई.ओ.राहुलकुमार मीना यांनी भेट द्यावी आणि सर्व संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी.ही मागणी जनतेतून केली जाते.


0 टिप्पण्या