गिरगाव ते मालेगाव रस्त्याचे हॉट मिक्सिंग रखडले; अनेक महिन्यांपासून काम ठप्प
चित्रा न्युज प्रतिनिधी
हिंगोली:- जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील गिरगाव ते मालेगाव जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच जीवघेणी व दयनीय होत चालली आहे. या रस्तावर मागील काही अनेक महिन्यापासून धुळीचे साम्राज्य, व रस्त्यावर पडलेली उघडी गिटी वाहनांच्या वेगामुळे शालेय विद्यार्थी, स्थानिक नागरीक तसेच ऐजा करणाऱ्या शेतमजुरांना उडून येत असलेल्या गिट्टीने दुखापत होतांना देखील बघायला मिळते आहे. या नवीन बनवलेल्या अर्धवट रस्त्यावर मात्र मागील गत वर्षापासून संबंधित अधिकारी व गुत्तेदार यांच दुर्लक्ष होत असल्याने डोकेदुखी ठरत आहे. सर्वत्र खड्डे, व रस्ताने जागोजागी गिट्टी उघडी पडलेली आहे. आणि हॉट मिक्सींग न केल्यामुळे रोड वरील गिट्टी उखडल्याने वाहनचालकांना दैनंदिन जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. आपण हा जो रस्ता बघतो आहोत तो हाच मालेगाव ते गिरगाव मुख्य रस्त्या आहे, आणि आपण बघतो की, कशा प्रकारे वाहन चालकांना जीव मुठीत धरून स्वतःला सावरत हा प्रवास करावा लागतो आहे.
स्थानिक नागरीकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही महिन्यांनपासून रस्त्याची देखभाल व काम पूर्णपणे थांबवले असून संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष प्रकर्षाने जाणवत आहे. वाढत्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांच्या घसरून होणाऱ्या अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
दरम्यान, नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही कामाचा वेग वाढलेला दिसत नाही. "रस्ता तातडीने दुरुस्त करा, नाहीतर मोठा अनर्थ ओढवेल,"अशी देखील मागणी यावेळी स्थानिकांनी केली आहे.
ह्या विषयाची तात्काळ दखल घेऊन लवकरात लवकर रस्ता दुरुस्तीची कामे सुरू करावीत, अशी जोरदार मागणी यावेळी वाहनधारक, शेतकरी बांधव, व स्थानिक ग्रामस्थांनाकडून होतांना दिसत आहे.


0 टिप्पण्या