Ticker

6/recent/ticker-posts

हाळी-हंडरगुळीत बसचे वेळापञक कोलमडले;प्रशासन माञ ढिम्मं..!


परिवहनमंञी लक्ष देतील का?


चित्रा न्युज प्रतिनिधी 
उदगीर :-तालुक्यात सर्वात मोठे भौगोलिक क्षेञ असलेल्या हाळी व हंडरगुळी या २ गावातुन उदगीर, अहमदपुर,नांदेड आगाराच्या बसेस धावतात.माञ,या आगारातील बस सेवा गत कांही काळापासुन पुर्णत: फसून बसली आहे.कारण,सकाळी या परिसरातील शेकडो मुलं-मुली शाळा,काॅलेजसाठी उदगीर,शिरुर ता.व अहमदपुरकडे जातात.तेंव्हा या मार्गे वेळेत एकही बस येत नसल्याने सकाळच्या सञातील म्हत्वाचे वर्ग शिकवणी "मीस" होते.परिणामी मुले मुलींना कमी गुणांचा फटका बसतो. सकाळी ७,८ च्या दरम्यान आल्या न आल्या की एकाच मार्गावर दोन,दोन ३,३ बसेस येतात.नाही की मग एक, १ तास येत नाहीत.आणि अशीच गत संध्याकाळी असते.म्हणुन येथून रोज उदगीर-अहमदपुरला ये-जा करणारे शेकडोजण वैतागून गेलेले दिसतात. व हा सगळा सावळागोंधळ माहीत असूनही वरिष्ठ अधिकारी ढिम्मंच असल्याने विद्यार्थींना व प्रवाशांना मोठा मानसिक ञास सहन करावा लागत आहे.तरीही एक ना धड भाराभर असलेले स्थानिक पुढारी तसेच कागदी वाघ असलेले कार्यकर्ते हेही याकडे लक्ष देत नाहीत तेंव्हा परिवहनमंञी तथा परिवहन मंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक हे तरी लक्ष देतील का?नव्हे त्यांनीच ही व येथील बसस्थानकातील समस्या पण दुर कराव्यात अशी मागणी या भागातील हजारो प्रवाशी,विद्यार्थी करत आहेत.
प्रवाशांच्या समस्या व तक्रारी सोडविणार कोण?
महामंडळाने प्रवासात सवलत दिली असल्याने मोरतळवाडी,खरबवाडी, चिमाचीवाडी,शेळगाव,टाकळगाव, रुद्रवाडी आदी गावातील विद्यार्थी व जनता हाळी मार्गे विविध शहरात जाण्यासाठी स.६ वा.पासून येथे येतात.माञ,या मार्गावर धावणारी एस.टी.बस वेळेवर कधीच येईना.व चुकून कधी आलीच तर वाटेत कधी बंद पडेल?याचा नेम नाही.तसेच या मार्गे बहूतांश भंगार बसेस सोडतात. त्या पण वेळेवर नाहीत.यामुळे शाळा काॅलेज विद्यार्थ्यांसह प्रवाशांच्या संतापात भर पडत चालली असून त्यांच्या समस्या व तक्रारी ऐकणारा कोणीच नाही.कारण,येथील बस स्थानकासह भंगार बसेसची सगळी माहीती वरिष्ठांना आहे.तसेच याची अनेकांनी पेपरबाजी केली.तरी पण याची दखल अद्याप कोणीच घेतली नाही.आणि कोणी घेईल याची पण खाञी दिसून येत नाही.म्हणुन मग पासधारकांनी,महिला,अपंग,जेष्ठ प्रवाशांनी तक्रार करायची तर कुठे? कारण,या मार्गे धावणा-या एकाही बस मध्ये तक्रार पेटी तसेच वरिष्ठांचे फोन नंबर नाहीत.तेंव्हा प्रवाशांच्या समस्या,तक्रारींची दखल कोण व कधी घेणार?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या