कल्याण :- डोंबिवलीत शिवसेनेची "विजय निर्धार सभा" मोठ्या उत्साहात पार पडली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली या सभेत मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली. उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना संबोधित करताना कल्याण डोंबिवलीत महायुतीच्या माध्यमातून हाती घेतलेल्या महत्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेतला.
डोंबिवलीत अनेक महत्त्वाचे विकास प्रकल्प उभे राहिले आहेत, ज्यामध्ये संत सावळाराम क्रीडा संकुल, कँसर हॉस्पिटल, तसेच संपूर्ण शहरात सिमेंट काँक्रीटचे रस्ते यांचा समावेश आहे. याशिवाय कल्याण शिळफाटा रस्त्याचे रुंदीकरण व मेट्रो - १२ च्या कामांचे प्रगतीपथावर असलेले काम विचारात घेण्यासारखे आहे.
या सभेत आमदार राजेश मोरे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक स्थानिक नेत्यांची उपस्थिती दिसली.


0 टिप्पण्या