Ticker

6/recent/ticker-posts

३ दिवसीय योग व आरोग्य शिबिर संपन्न

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-सेवानिवृत्त जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे स्नेहमिलन कऱ्यक्रामांचे औचित्य साधून सेवानिवृत्त ज्येष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यां चें आरोग्य सुदृढ राहण्याच्या दृष्टीने योगभारती बहुउद्देशीय संस्था छत्रपती संभाजी राजे योगउद्यान तर्फे ३ दिवसीय योग व आरोग्य  विशेष मार्गदर्शन शिबिर शिवार्पण टॉवर राजीव गांधी चौक भंडारा येथे येथे उत्साहात संपन्न झाले.
      शिबिरात दि:१३/१२)२०२५ ला डॉ. अमृथा यांनी रोग,आजार उदभवण्याच्या आधी ची घ्यावयाची काळजी व उपाय या बद्दल उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
दि:१४/१२/२५ ला पतंजली चिकित्सालय राजीव गांधी चौक भंडारा च्या प्रमुख वैद्य डॉ.रेणुका तिवारी यांनी कफ,वात, पित्त बाबत परिचय व निदान या विषयावर योग्य मार्गदर्शन केले.तर दि:१५/१२/२५ ला से.नी.आरोग्य अधिकारी डॉ.संजय मानकर यांनी योगाभ्यास आशर व निद्रा समन्वय या बाबद मार्गदर्शन केले.
वरील प्रमाणे ३ दिवसीय शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.या करिता योगभारती बहुउद्देशीय संस्था ,अंविशा चिकित्सालय शिवार्पण टॉवर ,शुभम ड्रायफ्रूटस  राजीव गांधी चौक यांचे विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रम यशस्वितेसाठी योगभारती संस्थेचे अध्यक्ष तथा वरिष्ठ योगगुरू श्री शाम कुकडे ,उपाध्यक्ष श्री अतुल वर्मा,सचिव श्री आत्माराम बेदरकर, श्री चींधूजी बुध्दे,श्री विठ्ठलराव सेलोकर,पियूष कुरंजेकर,शुभम गौतम,संजय मोहतूरे,पुरुषोत्तम साकोरे,लता मते, वनिता देशमुख,हेमलता हातझाडे,मधुकर गभने,प्रभाकर तीतीरमारे,पुरुषोत्तम समरीत, ई योग साधक,साधिका यांनी अथक परिश्रम केले व सहभाग नोंदविला 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या