चित्रा न्युज प्रतिनिधी
बुलढाण :- बुलढाणा जिल्हयातील मलकापूर रेल्वे स्टेशनला मालगाडीचे डबे घसरले आहेत ,तर नागपूर जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेची नागपूरकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे ,तर मलकापूर रेल्वे स्टेशन वर मालगाडीचे दोन डबे घसरले आहेत. मुंबई नागपूर रेल्वे रात्रीच्या वेळी मलकापूर रेल्वे स्टेशनवर मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. नागपूरकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती.
मुंबई नागपूर रेल्वे रात्रीच्या वेळेस मलकापूर रेल्वे स्टेशनवर मालगाडीचे दोन डब्बे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. नागपूरकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. रेल्वे विभागाने युद्ध पातळीवर काम सुरु करून घसरलेले डबे रुळावर ठेवण्यात यश आले आहे. मात्र रुळ बदलणारी यंत्रणेत बिघाड झाला आहे, ते काम सध्या युद्ध पातळीवर सुरु आहे. काही तासात मध्य रेल्वे डाऊनची सेवा पूर्ववत सुरु होईल, अशी माहिती रेल्वे विभागाने दिली आहे. मात्र या दुर्घटनेमुळे तीन तास या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. तर दुसरीकडे एचनाक मालगाडीचे दोन डबे रुळावरून नेमके कसे काय घसरले? हे अद्याप कळू शकलेले नाही.


0 टिप्पण्या