चित्रा न्युज प्रतिनिधी
नांदेड :-महामानव डाॅ. बाबासाहेबं आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज व हेलेन केलेर यांच्या प्रतिमेला वंदन करून जागतिक दिव्यांग दिनानिमित्त प्रहार दिव्यांग क्रांती संघटना – मुदखेड शाखेच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.तसेच नांदेड जिल्ह्या मध्ये, प्रत्येक तालुक्यात जागतिक दिव्यांगदिना निमित्त कार्यक्रम घेऊन जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला,मुदखेड मध्ये या कार्यक्रमास दिव्यांग बांधवांसह आर्मी सैनिक व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमात प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेचे मुदखेड मा.प्रमुख अनिल शेटे पा. यांनी मार्गदर्शन करताना दिव्यांगांसाठी सुरू असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली. “मा.प्रमुख या नात्याने दिव्यांगांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पूर्ण मदत करू,” असे आश्वासन त्यांनी दिले.
प्रहार संघटनेचे महिला प्रतिनिधी शंकरराव पा.शिंदे,दत्ता पा.नांद्रे व प्रहार ता.सचिव साहेबं निवडंगे यांनी दिव्यांग बांधवांना शुभेच्छा देत त्यांचा आत्मविश्वास वाढवणारे मार्गदर्शन केले.कार्यक्रमास रामराव पा.पावडे,आनंदराव साबळे,माधव आंनसापुरे,रमेश राऊत,पाटमाशे,अशोक निखाते,आणुसयाबाई साबळे,असलम शेख,आनंदा आठवले,मारोती बिच्छेवार,अभिजित चुंचे,विश्वनाथ हातागळे,ओमकार चव्हाणं,श्याम मुतकलवाड,शंकर मुपडे आदी मान्यवर उपस्थित होते.
दिव्यांग बांधवांचा सन्मान, त्यांच्या अडचणींची मांडणी आणि त्यावर उपाययोजना यांसह कार्यक्रम उत्साहात पार पडला. मुदखेड ग्रामस्थांच्या उपस्थितीने दिव्यांग दिनाचा कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण ठरला.


0 टिप्पण्या