चित्रा न्युज प्रतिनिधी
अकलूज :-अकलुज येथील शरदराव विश्वंभर लोहकरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.मृत्यू समयी ते ८८ वर्षांचे होते.त्यांच्या पाश्चात दोन मुले,दोन मुली,सुना,जावई,नातवंडे, परतवंडे असा परीवार आहे. अकलुजचे दैनिक लोकमतचे प्रतिनिधी राजीव लोहकरे व दैनिक जनमतचे पत्रकार व प्रेसफोटोग्राफर संजय लोहकरे यांचे ते वडील होते.पत्रकारी क्षेत्रात शरदराव लोहकरे यांचा मोठा हातखंड होते.माळशिरस तालुका व अकलूज परिसरातील झालेल्या विविध कार्यक्रमाच्या बातम्या दैनिक वृत्तपत्रापासून ते साप्ताहिक वृत्तपत्रापर्यंत जलदगतीने बातमी पोहचविण्याचे काम त्यांनी गेली ३० वर्षापासून केले आहे.वृत्तपत्त क्षेत्रात मुलांचे नाव मोठे व्हावे यासाठी रातोरात एसटीने प्रवास करून मुलांच्या बातम्या व फोटो सोलापूरच्या दैनिकांपर्यंत पोहचविण्याचे काम त्यांनी केले आहे.वेळप्रसंगी कधी कधी दैनिकांच्या कार्यालयात मुक्काम करून पहाटे दैनिकांच्या गाडी बरोबर अकलूजला येत होते.
त्यांच्या अचानक जाण्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


0 टिप्पण्या