चित्रा न्युज प्रतिनिधी
औरंगाबाद :-मानव विकास व पुनर्निर्माण संशोधन संस्था,औरंगाबाद,संचलित महाराष्ट्र विज्ञान, कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, गॅलेक्सी इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल तथा पीपल्स व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, वाळूज,यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे अध्यक्ष मा.श्री सुनील वाकेकर साहेब तथा सचिव मा. श्रीमती जयश्री बनकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्यात आला
याप्रसंगी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाराष्ट्र कॉलेजचे प्राचार्य श्री रवींद्र पंडुरे सर , प्रमुख पाहुणे गॅलेक्सी स्कूल चे मुख्याध्यापक श्री देवधन धुवे सर, उपमुख्याध्यापिका श्रीमती सलमा शेख मीस
प्रमुख वक्ते-श्री शहानवाज बेग सर, श्री मुजीब शहा सर तसेच श्री किरण तांबट सर इ. मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि
डॉक्टर ए. पी .जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले.
*महाराष्ट्र कॉलेजचे प्राध्यापक श्री शहानवाज बेग सर व श्री मुजीब शहा सर यांनी भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांचा फोटो महाविद्यालयास भेट म्हणून दिला.*
श्री शहानवाज बेग सर यांनी विद्यार्थ्यांना अल्पसंख्याकांविषयी, त्यांना संविधानाने दिलेल्या अधिकाराविषयी माहिती सांगितली. . तसेच श्री मुजीब शहा सर यांनी अल्पसंख्यांकांना शिक्षणाच्या समान संधी मिळाल्या पाहिजेत असे सांगून भारत सरकारकडून मिळणाऱ्या विविध सुविधांबाबत विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.
महाराष्ट्र काँलेजची विद्यार्थिनी बुशरा पठाण व तसेच इयता 5 वी वर्गातील विद्यार्थी प्रेम कारवाडे, मानसी मोती या विद्यार्थ्यांनी माहिती दिली. प्रा. श्री किरण तांबट सर यांनी आपल्या संस्थेला अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त असून आपल्या शाळा व महाविद्यालयातून अल्पसंख्यांकांना विविध सुविधा मिळतात याबाबत मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन गौरी तांबे हिने केले तर आभार अजिंक्य गायकवाड यांनी मानले. याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


0 टिप्पण्या