Ticker

6/recent/ticker-posts

अमेरिका येथील वरिष्ठ वैज्ञानिक,रिसर्चर डॉ. तारेंद्र लाखनकर यांनी मुंडिकोटा येथील ग्रा.प.व शाळेत भेट देवून मार्गदर्शन करून जुण्या आठवणींना दिला उजाळा


चित्रा न्युज प्रतिनिधी 
 भंडारा  :- अमेरिका येथील सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क येथे वरिष्ठ वैज्ञानिक, रिसर्चर,प्रोफेसर  डॉ तारेंद्र लाखनकर हे नुकतेच आपल्या मायदेशी गाव मुंडीकोटा येथे येवून आपल्या शिक्षक,मित्र परिवाराशी भेट घेतली आणि येथील प.प्राथमिक शाळा,सुभाष विद्यालय इथे जावून मुलांशी हितगुज करीत योग्य मार्गदर्शन केले.ग्राम पंचायत येथे श्री डॉ तारेंद्र लाखनकर यांचे ग्रा.प.तर्फे सरपंच सौ.प्रतिमा जैतवार, उपसरपंच श्री देवेंद्र मंडपे यांचे हस्ते शॉल,श्रीफळ देवून विशेष सत्कार व गौरव करण्यात आले. आणि त्यांचे सोबत आलेले ग्रीन हेरिटेज सोशल फाउंडेशन चे संस्थापक/अध्यक्ष मो सईद शेख, एमआई टी इंजिनिअरिंग कॉलेज(शहापूर) चे प्रिन्सिपॉल डॉ.प्रल्हाद हरडे सर, यशवंत लाखनकर,माजी मुख्याध्यापिका वच्छलाताई मेश्राम, चींदूताई कुकडे मुंडीकोटा यांचे ही या प्रसंगी  सत्कार करण्यात आले.या प्रसंगी डॉ लाखनकर यांनीआपल्या सत्काराचे उत्तर देताना योग्य मार्गदर्शन करीत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.सोबतच सईद शेख, डॉ प्रल्हाद हरडे ई नी ही डॉ लाखनकर यांच्या मुंडीकोटा टू अमेरिका प्रवासावर प्रकाश टाकले.संचालन श्री पारधी सर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या