चित्रा न्युज प्रतिनिधी
लाखनी(श.प्र.):-नवीन वर्षातील येणारा पहिला सण मकर संक्रांत ह्या सणाचे औचित्य साधून ग्रामपंचायत निलागोंदीने (दि.१८जानेवारी) रोज रविवारला दुपारी १.०० वाजता ग्रामपंचायत पटांगण या ठिकाणी सरपंच सौ.वर्षा महावीर वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे विधीवत पूजन करून पुष्पहार घालण्यात आले तसेच महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक सकारात्मक आणि प्रेरणादायी पाऊल म्हणून निलागोंदी ग्रामपंचायतच्या वतीने रथसप्तमीच्या कालावधीत हळदी कुंकू व तिळगूळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला माता-भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद,महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद, सहभागातून दिसणारी ऊर्जा व मिळालेले आशीर्वाद हीच महिलांच्या सामाजिक कार्याची खरी प्रेरणा दिसून आली.कार्यक्रमाला निलागोंदी गावातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत सौभाग्याच लेणं असलेले हळदीकुंकू एकमेकींना लावत तिळगुळ वाटप केले व कार्यक्रमाचा आनंद घेतला. तसेच वाण म्हणून महिलांना स्टील प्लेट वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.वर्षा महावीर वंजारी सरपंच निलागोंदी तर प्रमुख पाहुण्या ग्रा.पं. सदस्यां सौ.प्रियती दिलहर वरठे,सौ.विद्या मनोज हटवार,तसेच बचत गट सीआरपी सौ.दामिनी देवींद्र हटवार,माजी ग्रा.पं.सदस्या सुमनबाई परतेके,माजी पोलीस पाटील मायाबाई वंजारी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. याप्रसंगी महिलांनी पाणी बचत,स्त्री भ्रूणहत्या,बाल विवाह प्रतिबंध, स्वछता याचे काटेकोर पालन करण्याची जवळपास उपस्थित दोनशे महिलांनी शपथ घेतली. कार्यक्रमाचे संचालन प्रियती वरठे व आभार विद्या हटवार यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यास ग्रा.पं.कर्मचारी विनायक शेंडे तसेच पा.पु.कर्मचारी निलेश वंजारी यांनी सहकार्य केले.


0 टिप्पण्या