चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी:—उदगीर तालुक्यात खरीप हंगामातील अनेकांची तुर हे अतिपावसाने वाया गेल्याने अनेकांनी तुर मोडली आहे. माञ,हाळी येथील राजपाल रंगनाथराव माने यांनी त्यांनी तुरीची ४चारवेळा फवारणी करुन निगा राखल्याने आज नजर लागावी एवढी तुर शेंगांनी लगडली असून तुर शेंगांच्या ओझ्याने कलंडली आहे.तसेच तुरीत पेरलेले सोयाबीन निघताच त्या तेथे हायब्रीड,मका व हरभरा हे रब्बी हंगामातील पीक घेतले असून तुरीसह ही पिकेही जोमात आल्याचे दिसतात. सध्या परिसरात बहूतांश शेतकरी ऊसात तसेच तुरी मधील मोकळ्याजागेत पण अतरपीक घेताना दिसतात. त्या अनुषंगानेच उदगीर तालुक्यातील हाळी येथील राजपालभाऊ माने यांनी तुरीच्या ओळीतील सोयाची काढणी होताच त्या जागेवर हायब्रीड,हरभरा व मका हे पिक अंतरपिक म्हणुन पेरले असून सध्या तुरीसह आत असलेले अंतरपिकही खुप चांगल्याप्रकारे बहरल्याचे दिसुन येते.यंदा अतिपाऊस झाल्याने बहूतांश शेतकरी ऊसात व अन्य पिकांमध्ये अंतरपिक घेतल्याचे बघून हाळी-हंडरगुळीत अंतरपिक घेण्याची शर्यत तर लागली नाही ना.असे म्हटले तर हे चूक ठरणार नाही.


0 टिप्पण्या