Ticker

6/recent/ticker-posts

माहूर येथे जिजाऊ जयंती उत्साहात साजरी!

चित्रा न्युज प्रतिनिधी 
माहूर - राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंती निमित्य  मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड माहूर च्या वतीने दि 12 रोजी कपिलेश्वर धर्मशाळा येथे जयंती सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी राष्ट्रमातेच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी कु. स्वरा जगताप या चिमुकलीने जिजाऊ चरित्रावर अभ्यासपूर्ण भाषण केले तर  शिवमती अनुष्का जाधव, शिवमती ज्योती जगताप,यांनी राष्ट्रमाता जिजाऊ चरित्रावर प्रकाश टाकला, यावेळी जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्ष शिवमती जयश्री अडकीने, शिवमती प्रा. मंजुषा भंडारे,   शिवमती वर्षा कऱ्हाळे, शिवमती वर्षा जाधव, शिवमती मंगला चव्हाण, शिवमती वैजंती जाधव, शिवमती संगीता कोथळकर, शिवमती ज्योती गावंडे,शिवमती सुमन शिंदे, वेदिका अडकीने, राधिका अडकीने, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष दिगंबर जगताप, ज्ञानेश्वर कऱ्हाळे, जकुमार अडकीने, राजेश ठाकरे, सुधीर जाधव, विजय शिंदे,आनंद मोरे, सचिन बेहेरे, अमोल मोहिते आदीसह मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या