. मंडळ अधिकारी सुभाष साळवे व तलाठी शिल्पा ॲक्शन मोडवर
चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपुर : राजुरा तालुका अंतर्गत येणाऱ्या विरूर स्टेशन येथे दिनांक 12.1.2026 रोजी विरुर स्टेशन परिसरातील लेआऊट जागेवर असलेली सहा ब्रास रेती जप्त करण्यात आली सदर ही रेती पावडे नामक व्यक्ती यांची होती त्यांनी घर कामा साठी आणली होती. अशी गुप्त माहिती सुत्त्रा कडून मिळाली सदर गुप्त माहितीच्या आधारे ही माहिती मिळाली असता तत्काळ तलाठी शिल्पा यांनी घटनास्थळी पोहचून तहसिलदार ओमप्रकाश गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली करवाही करण्यात आली. त्यानंतर मंडळ अधिकारी सुभाष साळवे यांना माहिती दिल्या नंतर लगेच साळवे साहेबांनी तलाठी यांना विरुर स्टेशन येथून तीन ते चार कि. मी. अंतरावर असलेल्या खांबाळा गावाजवडील घटनास्थळी पाठवून विटा भट्टी देविदास खोबरे यांच्या जवळील चार ब्रास रेती साठा देखील जप्त करण्यात येवून त्यांवर योग्यती कारवाई करण्यात आली. अशा प्रकारे तलाठी व मंडळ अधिकारी यांची फार मोठी भूमिका यामध्ये दिसून आले. त्यामुळे रेती तस्करांचे धाबे दणांनले आहे.सदर पुढील दंडात्मक कारवाईसाठी तहसीलदार ओमप्रकाश गौड साहेब यांच्या कडे देण्यांत आली आहे.


0 टिप्पण्या