चित्रा न्युज प्रतिनिधी
मोहाडी : तालुक्यातील कांन्हा ळ गा व येथे जिल्हास्तरीय दोन दिवसीय समारोपी य सांस्कृतिक महोत्सव कलाकार मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव येथील अबोध भजन मंडळाच्या सुप्रसिद्ध गायिका नीलकमल गोंडाणे यांनी स्वागत गीत सादर केले. त्यांना पुष्पगुच्छ शाल प्रमाणपत्र सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शाहीर अरुण मेश्राम, रमेश रामटेके, भारत नागोसे, सुषमा टिचकुले, रेखा चौधरी, प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे, रवींद्र मेश्राम, गणेश देशमुख, राजू गजभिये, दिलीप मानापुरे, इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या