Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद हायस्कूल दशासर येथे क्रीडा महोत्सव


 चित्रा न्युज प्रतिनिधी            
अमरावती :-स्थानिक तळेगाव दशासर येथे जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे क्रीडा महोत्सवाचे थाटात उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी शाळेचे प्राचार्य माननीय प्रकाश राठोड यांच्या हस्ते तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाचे मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री अन्सार शहा व श्रीमती चामलोट या होत्या तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेची क्रीडा शिक्षक श्री प्रशांत साखरकर यांनी केले शालेय विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा वाव मिळावा म्हणून या तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले उद्घाटन प्रसंगी बोलताना प्राचार्य प्रकाश राठोड यांनी क्रीडा विषयातून विद्यार्थ्यांना करिअर कसे घडवता येईल याबद्दल मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता क्रीडा किती महत्त्वाचा विषय आहे याबद्दल सांगितले याप्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये क्रीडामय वातावरण व मोठ्या उत्साहाचे वातावरण दिसून आले वर्ग पाचवी ते बारावी पासून विविध गटात खो-खो कबड्डी हॉलीबॉल तसेच इतर मैदानी खेळ व वैयक्तिक खेळ या स्पर्धेमध्ये घेण्यात येणार आहे याप्रसंगी श्री डोके सर श्री भेंडे सर श्री जाधवर सर श्री जवंजाळ सर श्रीमती साबळे मॅडम श्रीमती झाडे मॅडम श्रीमती गादे मॅडम श्रीमती भारसाकडे मॅडम श्रीमती चव्हाण मॅडम श्री  विरुळकर सर अशा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सोबतच गावातील सोबतच क्रीडा स्पर्धेसाठी शाळेचे माजी विद्यार्थी शंतनू पंधरे भूषण जांभवले केतन ठाकरे कौशल लोया करण बगाडे यांनी सहकार्य केले सहकार्य केले मोठा प्रेक्षक वर्ग उपस्थित होता

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या