चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी :-उदगीर तालुक्यातील हाळी या गावातील इसम पुंडलीक दत्ताञ्य पंदीलवाड वय.४९ वर्षे हे बाहेरगावाहून दि.२६ जानेवारी रोजी हाळीकडे येत असताना त्यांना कसे तरी म्हणजे अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र,हंडरगुळी येथे नातेवाईकांने दाखल केले असता तेथे डाॅक्टरने तपासले असता ते वाटेतच -हदयविकाराने मयत झाले. असे डाॅक्टरने सांगितले.मग मयत पुंडलीक पंदीलवाड यांच्यावर हाळीत अंतिम संस्कार करण्यात आला.या मयताच्या नातेवाईकाने कांही दिवसानंतर नोंद करा व मयताचे प्रमाणपञ द्या. अशी विनंती केली असता ग्रा.पं.प्रशासनाने याची नोंद घेण्यास व मयताचे प्रमाण पञ देण्यास नकार दिला. तसेच याची नोंद पोलीसात झालीय.तसेच हा इसम आमच्या हद्दीत मेला नाही. असे म्हणुन हाकलले.असे मयताच्या नातेवाईकांसह पत्नीने सांगितले.तर याची माहिती विचारली असता पोलिसांकडे या बाबत कसलीच नोंद नाही.अशी माहिती बीट प्रमुख हे.काॅं. संजय दळवे-पाटील यांनी दिली.
एकंदर पाहता गावातील मयत इसमाच्या कुटूंबासह गोरगरिबांची अडवणूक व पिळवणूक करण्याचे महापाप ग्रा.पं.करत आहे.