Ticker

6/recent/ticker-posts

हाळी येथील अहिल्यादेवी चौक अडकला दलदलीत..!!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-बैल बाजार भरत नसलातरी सुध्दा हाळीचा बाजार अशी ओळख सबंध भारतात असलेल्या उदगीर तालुक्यातील हाळी या गावच्या या ओळखीला "काळीमा" फासण्याचे "पाप" ग्रा.पं.च्या सत्ताधा-यांनी व त्यांचा "बाॅस" असलेल्याने केले असल्याचे अहिल्यादेवी होळकर चौकाकडे बघून म्हटले तर हे चुकीचे होणार नाही.
कारण,हाळी म्हटलं की बैल बाजारचे गाव,अशी ओळख भारताच्या विविध राज्यात आहे. म्हणुन हाळीकरांची छाती अभिमानाने फुगते व मान रुबाबाने उंचावते.पण या अभिमानास व रुबाबास तसेच गावच्या नावास "बट्टा' लावण्याचे "पाप" गावच्या कारभा-यांकडून होत आहे.आणि याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अहिल्यादेवी होळकर चौक आहे. कारण,आहिल्यादेवी यांची प्रतीमा ज्या चबुत-यावर, ओट्यावर बसवली आहे त्याच्या परिसरास होळकर चौक असे म्हटले जाते.पण हाच चौक गत कित्येक महिण्यांपासून घाणींच्या,दुर्गंधीच्या व उकिरड्याच्या गराड्यात अडकल्याचे जनतेला दिसते.पण ग्रा.पं.च्या सत्ताधा-यांना दिसत नसल्याने हाळीतील अहिल्यादेवी होळकर चौक परिसराला गटारीचे स्वरुप आले आहे.या चौका लगत तुंबलेल्या गटारीमुळे तसेच उकीरड्यामुळे परिसरात दुर्गंधीसह डासांचे साम्राज्य पसरल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य डेंझर झोन मध्ये गेले असून हाळी मधील नागरीक ग्रा.पं.च्या कारभारावर तीव्र नाराजी व संताप व्यक्त करतात.
ज्यांनी पदावर बसवले त्या बोक्याला विचारल्याशिवाय सरपंच,उपसरपंच कोणतेही काम करत नाहीत.परिणामी गावात विकास कामांचा बोजवारा उडाला आहे.असे अहिल्यादेवी होळकर चौक परिसरात दबक्या आवाजा मध्ये कांहीजण बोलत असलेतरीही आहिल्यादेवी होळकर प्रेमींना हा चौक घाणींत,उकीरड्यात असल्याचे तीळभर ही दु:ख  वाटत नाही.याचेच नवल वाटते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या