Ticker

6/recent/ticker-posts

नगराध्यक्षा रेश्मा लालासाहेब अडगळे यांनी स्विकारला कारभार

चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर :-अकलुज नगरपरिषदे च्या पहिल्या नगराध्यक्षापदाचा कार्यभार नगराध्यक्षा रेश्मा लालासाहेब अडगळे यांनी आज स्विकारला.तर  पहिल्या सभेत उपनगराध्यक्षपदी शिवतेजसिंह मोहिते पाटील यांची बिनविरोध निवड झाली असुन स्विकृत नगरसेवकात मिलिंद कोतमिरे,योगेश गांधी,अझरुद्दीन शेख यांची वर्णी लागली.
अकलुज नगरपरिषदेची सन २०२१ स्थापनेनंतर ४ वर्षांनी सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर २०२५ रोजी  होवुन पहिली कार्यकारिणी अस्तित्वात आली होती. त्यानंतर २२ दिवसांनी आज १२ जानेवारीस नुतन  कार्यकारिणीने नगर परिषदेची सूत्रे हाती घेतली.
तत्पूर्वी उपनगराध्यक्ष पदासाठी शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी सुचक सयाजीराजे मोहिते पाटील व  सचिन देशमुख यांच्या अनुमोदनाने उमेदवारी अर्ज मुख्याधिकारी सचिन पाटील यांच्याकडे दाखल केल्या नंतर नगराध्यक्षा रेश्मा अडगळे यांनी नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारत त्याच्या अध्यक्षतेखालील पहिल्या सभेत उपनगराध्यक्ष व स्विकृत सदस्य निवड असे दोन विषय होते.राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे गटनेते शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचा एकच अर्ज दाखल असल्याने त्यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे नगराध्यक्ष रेश्मा अडगळे यांनी जाहीर करुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मिलिंद कोतमिरे, योगेश गांधी,अझरुद्दीन शेख हे स्विकृत नगरसेवकपदी निवड झाल्याचे नगराध्यक्षा अडगळे यांनी जाहीर केले.
पदभारानंतर माजी उप मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,जयसिंह मोहिते पाटील,स्वयंमप्रभादेवी मोहिते पाटील,आ.रणजितसिंह मोहिते पाटील,खा.धैर्यशील मोहिते पाटील,शितलदेवी मोहिते पाटील,किशोरसिंह माने पाटील,संग्रामसिंह मोहिते पाटील,ऋतुजादेवी मोहिते पाटील,,शिवन्या मोहिते पाटील,युगंधरा माने पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
स्विकृत तीन नगरसेवकात निवडणुकमध्ये पराभूत उमेदवार योगेश गांधी,सना शेख यांचे पती अझरुद्दीन शेखसह मिलिंद कोतमिरे यांना संधी देत जैन,मुस्लिम व हिंदु खाटीक समाजातील बांधवांना संधी देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या