Ticker

6/recent/ticker-posts

शासन आपल्या दारी आणि अवैध दारु मिळते दारोदारी


हाळी येथील किरकोळ विक्री दुकाणातुन ठोक मध्ये बाॅक्सच्या बाॅक्स विक्रीला आर्शिवाद कुणाचा ?
 
चित्रा न्युज प्रतिनिधी 
हाळी:-उदगीर तालुक्यातील सर्वात मोठे व आठवडी बाजाराचे गाव असलेल्या हाळी येथे शासनमान्य किरकोळ देशी दारु विक्रीचे 1 दुकाण आहे. तसेच"शासन आपल्या दारी" ही एक राज्य शासनाची टॅग लाईन आहे.आणि या लाईन ला मॅच होणारी दारु मिळते दारोदारी!ही नवी टॅग लाईन उदगीर तालुक्यातील हाळी येथील देशीदारु दुकाणच्या मालकाने बनवल्याचे चिञ या दुकाणातुन होणारी देशी दारुच्या पेट्यांची अवैध विक्री व वाहतूकीतुन दिसते.  किरकोळ विक्रीचा परवाना असूनही अहमदपुर,चाकुर, जळकोट,उदगीर या चार तालुक्यातील कांही अवैध देशीदारु विक्रेते हाळीच्या दुकाणाशी आणि हाळीचा दुकाणदार हा प्रशासनाशी कनेक्टेड असल्याने दररोज १०ते१५पेट्यांची वाहतूक होत असल्याचे प्रत्यक्षदर्शी जनतेत बोलले जाते.     कांही दारु विक्रेत्यांना अवैधरित्या दारु विकता यावी,यासाठी रोज ठोक मध्ये देशी दारुचे बाॅक्सच्या बाॅक्स विकत असून हाळीत किरकोळ विक्रीचा परवाना असतानाही ठोकमध्ये देशी दारुचे बाॅक्सच्या बाॅक्स कुणाच्या आर्शिवादाने विक्री करतोय?असा सवाल हाळी व आसपासच्या गावातील नागरिकांकडून विचारला जात आहे.
वरील ४ तालुक्यातील कांही गावातील अवैध दारु विक्री करणा-यांना हाळी येथील दुकाण जवळ पडते.तसेच हाळीच्या दुकाणातुन हवे तेवढे दारुचे बाॅक्स (पेट्या) बिनधास्तपणे इच्छीतस्थळी घेऊन जाता येते.म्हणुन या परिसरातील विक्रेते दारुची दिनदहाडे वाहतूक व विक्री करतात.ते पण अवैधरित्या!  कारण,किरकोळ विक्रीचा परवाना असतानाही ठोक मध्ये पेट्यांच्या पेट्या विकत असल्याचे माहित असूनही हाळीच्या शासनमान्य देशी दारु विक्रेत्यावर आजवर कारवाई झाली नाही.तसे धाडस कुणीही दाखविले नाही.म्हणुन या दुकाणातून देशी दारुच्या बाॅक्सच्या बाॅक्सची अवैध वाहतूक धुमधडाक्यात होतच असते. म्हणुन याला आर्शिवाद देतो कोण व का?किरकोळ विक्री असा बोर्ड असूनही अवैध विक्रेत्यांना बाॅक्सच्या बाॅक्स दारु विकण्याचा असा कोणता कायदेशीर परवाना हाळीच्या किरकोळ विक्रेत्याकडे आहे?असे प्रश्न उपस्थित होतात.
दुकाण वैध की अवैध ? हा सवाल सुजाण नागरिक उपस्थित करत आहेत.
कारण,हाळी येथील देशी दारु विक्रीच्या दुकाणावर असलेल्या बोर्डावर ना मालकाचे नाव आहे.ना सी. एल.१,२ वगैर असा उल्लेख आहे,यामुळे हे दुकाण वैध आहे का अवैध?तसेच याचा परवाना कुठला आहे?हाळी चा का अन्य ठिकाणचा?या सगळ्यांचा छडा लावून या दुकाण मालकाला धडा शिकवणार कोण?याकडे हाळी परिसराचे लक्ष लागले आहे.  
*या बाबत विचारणा केलो असता या भागाची जबाबदारी रोठे नामक एस.आय.कडे आहे. त्यांना बोला.अशी माहिती फोनवरुन राऊशु. अधिकारी विजय मनाळे यांनी दिली.तर याबाबत सांगण्यासाठी फोन केला असता रोठेंनी रिस्पाॅन्स दिला नाही!म्हणजे यांना हा दुकाणदार चांगले शुल्क तर देत नाही ना?असा संशय व्यक्त होत आहे.कारण,या बद्दल माहिती असूनही हाळी येथील दुकाणदारावर कारवाई न करता सतत अवैध विक्रेत्यांना टारगेट केले जाते.म्हणुन*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या