चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा:-दि.२० जानेवारी २०२६ ला ग्रामीण रुग्णालय अडयाळ येथे राष्ट्रीय मानसिक आरोग्य शिबीर
जिल्हा रुग्णालय भंडाराच्या वतीने आयोजित करण्यात आले ,ज्यामध्ये मानसिक आजार, डोकेदुखी,ताण तणाव, उदासपणा, चिंता रोग, बैचेनी, घबराहट,मिर्गी, सेक्स समस्या,व्यसन समस्या, लकवा, मेंदूचे आजार, तसेच हृदय रोग मधुमेह, बीपी ई. ची तपासणी तज्ञ मंडळींकडून करण्यात आली. तसेच या शिबिरात आहार, योग विषयक तज्ञ मंडळींकडून सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्री सोहेल खान ग्रामपंचायत सदस्य हे होते,सोहेल खान यांनी "आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी व निरोगी राहण्यासाठी वारंवार डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असून डॉक्टर हे या काळातील देवदूत,जीवन देणारे आहेत,आरोग्यासाठी शासनाच्या अनेक योजना असून त्यांचा नागरिकांनी पुरेपूर लाभ घेण्याचे" आवाहन केले.प्रमुख पाहुणे म्हणून श्री मुनीश्वर बोदलकर, (तमुस अध्यक्ष) डॉ.बनसोड (एमओ), डॉ.मनीष बत्रा (डेंटिस्ट), डॉ.निखिल बांगडकर, डॉ.अंकिता शहारे ,श्रीमंती चकोले (आहार तज्ञ), श्रीमती ठोंबरे (योग तज्ञ), डॉ. बांडेबुचे (मानसोपचारतज्ञ),हे होते.यांनी विविध मानसिक आजारा संदर्भात गावातील नागरीकांना व रुग्णांना मार्गदर्शन केले. जनरल फिजिशीयन डॉ.बन्सोड, श्रीमती चकोले, आहार तज्ञ, श्रीमती माधुरी ठोंबरे योगा थेरपीस्ट, यांनी ही योग्य ते मार्गदर्शन केले . सुत्रसंचलन श्री तुमदेव बनसोड यांनी केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सतिश भगत (सायकॉलॉजिस्ट) यांनी केले व आभारप्रदर्शन माधुरी साखरवाडे (पीएसडब्ल्यु)यांनी केले. सदर कार्यक्रमास उपस्थित कु.कातोरे (कौन्सीलर), श्री मनिष भारसाकरे , श्री चेतन जाधव ,श्री. दीपक थाटे (समाजसेवा अधिक्षक), तसेच रूग्णालयातील अधीपरिचारिका वर्षा पाटील, बन्सोड सिस्टर व इतर कर्मचारी वृंद टीम डीएमएचपी भंडारा ई उपस्थित होते.


0 टिप्पण्या