Ticker

6/recent/ticker-posts

२ लाख १९ हजार १०० रुपयेचा प्रतिबंधक असलेला गुटखा वाहनासह जप्त,,,,,,,,,,,,


पैठण एमआयडीसी पोलीसांची धडकेबाज कारवाई........

चित्रा न्युज प्रतिनिधी 
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)  :- पैठण एमआयडीसी पोलीस ठिणेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक ईश्वर जगदाळे यांना खबर्‍याकडून गोपणीय माहिती मिळाली की,छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) ते पैठण रोडने छ.संभाजीनजर कडून पैठणकडे एक किराना सामान माल वाहतुक करणार्‍या वाहनात किराणा सामानाच्या खाली लपवुन प्रतिबंधक असलेल्या गुटक्याची अवेद्दरित्या वाहतुक करत आहे.अशी पक्की माहीती मिळाली,हि माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरिक्षक ईश्वर जगदाळे यांनी तात्काळ वाहनावर कारवाई करण्याचे सुचना दिल्या.एमआयडीसी पोलीस पथक पाठवुन त्या पथकाला खात्री करुण कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या.सदर पथकाने सापळा रचुन वाहन थांबविले सदर वाहन चालकार नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव नागूश रामनाथ लांडे (वय ३३ वर्ष) रा.पाटेगाव ता.पैठण असे सांगितले.त्याला विचालरे या वाहनात काय आहे असे त्याने किराना सामान असल्याचे सांगितले.त्या वाहतुक वाहनाची पाहणी केली असता बाहेरुन सदर त्या वाहनामध्ये पुर्ण किराणा सामानाने भरलेली दिसली होती.त्यावेळी गाडी चालकास गाडीत सामानामध्यू गुटखा आहे का?अशी विचारणा केली असता त्याने गुटका नसल्याचे सांगितले.परंतु त्याच्या बोलण्यावरुण व हलचालीवरुन पोलीसांंना संशय निर्माण झाल्याने त्या गाडी वाहनातुन सामान उतरवुन चेक केले असता किराणा सामानाच्या खाली प्रतिबंधक असलेला गुटखा लपवुन ठेवल्याचे निदर्शनास आले.सरद वाहन व गुटखा असा एकुन २ लाख १९ हजार १००/ रुपये किमंतीचा माल जप्त करुण आरोपीने प्रतिबंधक केलेला गुटखा विक्री करत स्वत:च्या ताब्यात बाळगुन वाहतुक करीत असताना मिळुन आल्याने गुन्हा नोंद करुन आरोपीस अटक करुन मा.न्यायालयाकडून एक दिवसाचा पी.सी.आर मिळाला असुन ईतर आरोपी निष्पन्न करुन सदर आरोपीवर कारवाई करण्यात येणार आहे.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक विनयकुमार राठोड,अपर पोलीस अधिक्षक अन्नपुर्णा सिंह,पैठण उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण एमआयडीसी पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे,पोउनि बुरकुल,पोकाँ २३७ गुडेकर,पोकाँ २३५ उगले यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या