Ticker

6/recent/ticker-posts

अकलूज येथील युवक अरबाज नजीर तांबोळी यांचे अपघाती निधन

वय 21 वर्ष. तो कराड गावावरून 16 पीर या देवस्थान वरून अकलूज कडे येताना माळशिरस जवळ गारवाड पाटी जवळ ट्र्याकर क्र., mh 13 a j 9467 यावर  धडक लागून मुर्त्यू झाला.

चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर :-अकलूज येथील युवक अरबाज नजीर तांबोळी यांचे एका दुर्दैवी अपघातात  निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण अकलूज परिसरात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे.तरुण वयातच काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे.त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तर मनात हळहळ निर्माण झाली आहे.
त्यांच्या पश्चात वडील नजीर गुलाब तांबोळी, आई जरीना नजीर तांबोळी आणि विवाहित बहीण महेक अल्ताफ तांबोळी असा परिवार आहे. घरातील कर्ता तरुण सदस्य गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अरबाज नजीर तांबोळी यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या