Ticker

6/recent/ticker-posts

हिमायतनगर शहरात भाजपाच्या विजयाचा कार्यकर्त्यांन कडून जल्लोष साजरा....


👉🏻 पेढे भरवत फटाके फोडून जल्लोष साजरा...


चित्रा न्युज प्रतिनिधी 
नांदेड  :-भारतीय जनता पार्टी कडून महाराष्ट्रातील 29 महानगरपालिके पैकी अंदाजे 25 ते 26 महानगरपालिके वर भारतीय जनता पार्टीने एक हाती वर्चस्वत निर्माण करत विजय मिळविला त्यामुळे शहरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी श्री परमेश्वर मंदिर समोर फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला....
 याबाबत सविस्तर वृत्त असे की मुंबई महानगरपालिका संपूर्ण महाराष्ट्रा बरोबर नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने एक हाती वर्चस्व निर्माण करत 81 पैकी 49 जागेवर दणदणीत विजय मिळविला त्यामुळे हिमायतनगर शहरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आज दिनांक 16 जानेवारी रोजी सायंकाळी श्री परमेश्वर मंदिर समोर फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत आनंद उत्सव साजरा केला यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचे अभिनंदन करून हा आनंद उत्सव साजरा केला  यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते तथा नगरसेवक डॉ. राजेंद्र वानखेडे, तालुका अध्यक्ष गजानन  चायल,नगरसेवक तथा भाजपा गटनेते आशिष भाऊ सकवान, नगरसेवक भारत डाके, भाजपा सोशल मीडिया जिल्हा संयोजक नागेश शिंदे, रामभाऊ सूर्यवंशी, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष कल्याण सिंग ठाकूर,विलास वानखेडे,विपुल दंडेवाड गणेश रामदीनवार, माधव पाटिल करंजीकर  यांच्या सह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या