Ticker

6/recent/ticker-posts

तळेगाव दशासर येथील एक दाणी शंकर पटाला प्रारंभ




नामांकित बैल जोड्या चे आगमन

चित्रा न्युज प्रतिनिधी 
तळेगाव दशासर :-कृषक सुधार मंडळ द्वारा आयोजित  गुरुवार 15 जानेवारी रोजी झालेल्या दो दाणी शंकर पटाच्या आयोजनानंतर  16 जानेवारी रोजी एक दाणी शंकर पटाला प्रारंभ   झाला असून यावेळी  एकदानी शंकर पटाचे   उदघाटन माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप याच्या हस्ते करण्यात आले.या  वेळी प्रमुख उपस्थिती  शिवाजीराव देशमुख, कविता ताई श्रीकांत गावंडे, मीनाक्षी ताई ठाकरे,
अनिताताई मेश्राम, श्रीकांत  गावंडे, मोहन भाऊ घुसळीकर, वसंतराव देशमुख, मोहन भाऊ सिंघवी, रमाकांत इंगोले, आनंद देशमुख, सुयश देशमुख, मनोज भाऊ ढोबळे, इत्यादीची प्रमुख  उपस्थिती होती.
तसेच  
अशोकराव  गायकवाड, डॉ विनोद देशमुख, रवी चुटे, माणिक बगाडे,पोमेश थोरात, विवेक सराफ, संजय हागे, प्रशांत  साखरकर, किशोर मेश्राम, संदीप वैदय, संजय राऊत, विकास नवरंगे,शंकर शेलोकार  मोरेश्वर बगाडे इत्यादी   उपस्थित होते.
आज होणाऱ्या एकदानी पटामध्ये
विविध ठिकाणाहून नामवंत जोड्या चे आगमन झाले आहें
एकदानी शंकर पटामध्ये  अ गट व क गट या दोन्ही गटा मध्ये विजय मिळविण्यासाठी चुरस आपल्याला पाहायला मिळाली असून एकदानी स्पर्धेत कोणती बैल जोडी  बाजी मारणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

आज झालेल्या एकदानी शंकर पटात  भैरव /सेवा, तकदीर/ लाख्या ,सर्जा /शिव,देवा /  लाख्या,मिथुन /बजरंग, हिरा / मोरया, श्रीराम/ बादल, पिंट्या/ भोंडया, लुटेरा / रॉकेट,  शेरा/ लकी, देवा/ लखन, विराट/ मोरया, रायबा/ देवा,
इत्यादी बैल जोड्या सहभागी झाल्या  असून 16 व 17 जानेवारी रोजी होणाऱ्या एकदानी  शंकरपटाचा विजयाचा मानकरी कोण होणार याकडे लक्ष लागले आहें  उद्या दि.17 जानेवारी रोजी निकाल ठरणार विजयाचे मानकरी.

या शंकरपटात मोठया प्रमाणात  शेती उपयोगी साहित्य विक्रीस
उपलब्ध असतात.
तसेच मनोरंजनासाठी विविध प्रकारच्या झुले असून लहानमुले व तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर आनंद घेत आहें.
आता लक्ष वेधले आहे 17 जानेवारी रोजी होणाऱ्या बक्षीस वितरणात कोन बाजी मारणार या कडे गावकर्यांचे लक्ष लागले आहें.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या