Ticker

6/recent/ticker-posts

चोले वाडी पैनगंगेच्या तीरावरील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता! काकडा आरती, हरीनाम सप्ताह, आकर्षक दिंडी, होम हवन,भजन उत्सवाने गाव दुमदुमले


चित्रा न्युज प्रतिनिधी 
माहूर-गेल्या बारा वर्षापासून सतत  पैनगंगेच्या तीरावरती सुरू असलेल्या सपत्याची सांगता ह. भ. प. शिवा महाराज यांच्या कल्याच्या कीर्तनाने करण्यात आली.
हरी नामाचा गजर हरिनामाचा काठी डाव मांडिला, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल' अशा विठूरायाच्या गजरात चोले वाडी टाकळी गावात हनुमान मंदिरा पासून दिंडी काडून हरीनाम सप्ताह सोहळ्यानिमित्ताने हरिनामाचा गजर करण्यात आला गावात घरो घरी रांगोळी सडा टाकून दिंडीचे स्वागत केले सात दिवसात सुरु असलेल्या पारायण, भागवत, हरिपाठ, भारूड, महाप्रसाद आणि रात्रीला कीर्तनाचा कार्यक्रम तसेच धार्मिक कार्यक्रमांमुळे पैंणगंगे काठावर जणू पंढरपुरासारखे वातावरण पाहायला मिळाले
या सोहळ्यात अनेक दानशूर व्यक्तीं यांच्या कडून महाप्रसाद देऊन विशेष सहकार्य केले तसेच या कीर्तन सोहळ्यात पारायण ह. भ. प.विलास महाराज टाकळीकर आणि भागवत ह. भ. प.  शिवा बापू महाराज यांच्या मधुर वाणीतून भागवत कथा पार पडली. या अखंड हरिनाम सप्ताह विशेष म्हणजे चिमुकल्याने हरिपाठ करून उपस्थिताची मन जिंकले.यावेळी कर्तन सोहळ्यात सांगतानां येणाऱ्या पिढीतला माणूस घडवण्यासाठी अशा सोहळ्याचे आयोजन करणे काळाची गरज असल्याची भावना ह. भ.प. निवृत्ती महाराज चाटे यांनी आपल्या कीर्तनातून सांगितले!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या