Ticker

6/recent/ticker-posts

अव्वल कारकून संतोष गावंडे यांचा अपघातात मृत्यू

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : येथील श्रीकृष्ण नगर सुमठाना परिसरातील रहिवासी व कोरपना तहसील कार्यालयात अव्वल कारकून संतोष गावंडे (५२) यांचा ३० जानेवारी अपघातात मृत्यू झाला. कर्तव्य बजावून भद्रावतीकडे परत येत असताना झालेल्या अपघातात त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला.
संतोष गावंडे हे यापूर्वी भद्रावती तहसील कार्यालयात अव्वल कारकून म्हणून कार्यरत होते. सध्या त्यांची नियुक्ती कोरपना तहसील कार्यालयात करण्यात आली होती. येत्या दोन महिन्यात त्यांची नायब तहसीलदार पदावर पदोन्नती होणार होती. मात्र नियतीने त्यांच्यावर घाला घातला संतोष यांच्या जाण्याने भद्रावती परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा मोठा अप्तपरिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या