Ticker

6/recent/ticker-posts

मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन !

१७ शाळांचा सहभाग: दोनशे विद्यार्थी गाणार गोड आवाजात मराठी समूहगीत 



चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : आरोही सुगम संगीत विद्यालय  राजुरा केंद्र बावन व स्वर प्रीती कला अकादमीच्या वतीने  मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने दि.२६फेब्रुवारीला सकाळी ९:३० वाजता राजूराच्या शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठी समूहगीत गायन स्पर्धेचे निःशुल्क आयोजन करण्यात आले आहे.
 या स्पर्धेत १७ शाळा सहभागी असून ही स्पर्धा जिल्हास्तरीय होत  आहे. 
स्वर प्रितीचे अध्यक्ष दिलीप सदावर्ते व आरोही सुगम संगीतच्या केंद्रप्रमुख संयोजिका तथा मार्गदर्शिका  अलका सदावर्ते यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे हे आयोजनाचे यंदा दुसरे वर्ष आहे. सदरहू स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळत असून सनराइज् स्कूल जिल्हा परिषद शाळा रामपूर, पी .एम. श्री डॉक्टर झाकीर हुसेन राजुरा, इंदिरा गांधी डिजिटल स्कूल राजुरा नगरपरिषद, आशादेवी प्राथमिक शाळा, किडझी स्कूल, आदर्श प्राथमिक शाळा, ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल, आदर्श हायस्कूल राजुरा, इन्फंट जीजस स्कूल राजुरा स्कूल,  न्यू इरा इंग्लिश स्कूल राजुरा ,बालाजी हायस्कूल बामणी, सांगडा पाटील आश्रम शाळा, शिवाजी हायस्कूल राजुरा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चिंचोली, जिल्हा परिषद राजुरा, सोनिया गांधी स्कूल राजुरा अश्या एकूण  सतरा शाळांचा सहभाग आहे .प्रत्येक शाळेला सहभाग प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह आरोही सुगम संगीत विद्यालयाकडून देण्यात येणार आहे या शिवाय प्रथम द्वितीय तृतीय असे पारितोषिक देखील देण्यात येणार आहे .
विशेष म्हणजे या स्पर्धेत सहा चमू तबला पेटीवर गायन सादर करणार असून हे करा ओके म्युझिक सिस्टीमवर आपले सादरीकरण करणार आहेत . उपरोक्त स्पर्धा निशुल्क असून सर्व स्पर्धकांना व मार्गदर्शक व शिक्षकांना कार्यक्रमानंतर भोजन व्यवस्था करण्यात आलेली आहे. २७फेब्रुवारीला दहावीचा इंग्रजीचा पेपर असल्यामुळे ही स्पर्धा २६ फेब्रुवारीला पूर्वदिनाला आयोजित केली आहे असे कार्यक्रमाचे आयोजक दिलीप सदावर्ते , अलका सदावर्ते तथा सह आयोजक टीमचे प्रमुख  सुनील रामटेके यांनी सांगितले.आयोजित कार्यक्रमाला अनेक मान्यवर मंडळीची उपस्थिती राहणार आहे. 
 रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येंने उपस्थित राहून मराठी भाषा गौरव दिन साजरा करावा व सर्व बालगोपालांच्या मराठी गीताचे सादरीकरणाचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 
 सुनील रामटेके , छोटूलाल सोमलकर, संदीप कोंडेकर, प्रीती पुराणिक, अबोली सदावर्ते, मोनिका निळे, अनुष्का रैच, बिना देशकर, स्वरूपा झंवर आदिं अथक परिश्रम घेत आहेत.
परिक्षक म्हणून महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या गोड व मधूर आवाजाच्या गायिका रश्मि हिवरे व अनिल देशपांडे हे काम बघणार असल्याचे  दिलीप सदावर्ते, अलका सदावर्ते व सुनिल रामटेके यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या