Ticker

6/recent/ticker-posts

स्वच्छ भारत अभियान आहे तरी कुठे दवाखान्यातच वाजतात तीनतेरा.❓


⭕जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातच नागरिकांचे आरोग्य धोक्यात.❓

⭕ नालीत कचरा, सांडपाणी तर परिसरात देशी.. विदेशी दारूच्या बाटल्या❓ 

चित्रा न्युज प्रतिनिधी 
नागपूर :- गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात घाणीचे  साम्राज्य पसरले असून, या परिसरातील नाल्यामध्ये कचरा असल्याने दुर्गंधी युक्त घाण पहावयास मिळत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. इतकेच नव्हे तर जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमाचे तीनतेरा वाजले आहेत. अनेक डॉक्टर रुग्णांना  दारू पिऊन नका असे आवर्जून सांगतात. गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असुनही चोवीस तास आरोग्य सेवा उपलब्ध असलेल्या  जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात देशी विदेशी दारूच्या बाटलाही  पहावयास मिळतात. हि शोकांतिका , लाजीरवाणी बाब म्हणावी लागेल. गडचिरोली जिल्ह्यात विविध प्रकारचे विकास योजना राबविल्या जात असल्याचा दिंडोरी पिटला जात असला तरी  तेवढ्याच प्रमाणात अस्वच्छता असल्याने नागरिकांचे आरोग्य विषयक प्रश्न ऐरणीवर आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात असलेल्या घाणीमुळे कॉलरा, टायफॉइड,  अतिसार, मलेरिया आणि डेंग्यू यांसारखे गंभीर आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही . हे आजार दूषित पाणी, अन्न आणि अस्वच्छतेमुळे होतात हे आरोग्य प्रशासनाच्या लक्षात येत नाही का❓ परिसरात असलेल्या अस्वच्छतेवर  जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाच्या वतीने तातडीने उपाय योजना करून होणाऱ्या आजारावर  आळा घालण्यासाठी प्रयत्न करावे. या परिसरात टाकलेले  अन्न  ,अन्य  प्रकारची घाण आणि जिल्ह्यात दारू बंदी असली तरीही देशी विदेशी दारुच्या बाटल्या पहायला मिळतात यावरून  जिल्हा शल्य चिकित्सक  यांचे प्रशासन  किती कार्य कुशल आहे याची प्रचिती येते.  जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक ठिकाणावरुन  उपचारासाठी रुग्ण  दाखल होतात परंतु परिसरात असलेल्या घाणीमुळे डासांची पैदास झालेली आहे.घाणीमुळे टायफॉइड, कॉलरा, अतिसार, पोटाचे विकार,  मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया,अस्वच्छतेतूनत्वचेचे विकार, घसा खवखवणे , या सारखे अनेक आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. ईतकेच नव्हे तर जिल्हा सामान्य रुग्णालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने रुग्णांवर वेळेवर  उपचार केले जात नाही. ओ पी डी  सकाळी 8 वाजता असली तरी डॉक्टर मात्र दहा वाजता नंतरच येत असल्याने रुग्णांना आणि नातेवाईकांना तासोनतास ताटकळत वाट पाहत बसावे लागते. हि गंभीर बाब लक्षात घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक , आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या