Ticker

6/recent/ticker-posts

राजकुमार भगत यांचा सामाजिक आदर्श!

मुलगी रित्वीचा वाढदिवस धुंडीच्या वृद्धाश्रमात साजरा

चित्रा न्युज प्रतिनिधी 
यवतमाळ :-धुंडी येथील स्व. चंदू नाईक जेष्ठ नागरिक गृह जवाहर नगर, धुंदी ता. पुसद येथे सामाजिक कार्यकर्ते राजकुमार भगत यांची मुलगी रित्वी हिचा वाढदिवस अत्यंत साध्या व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या वातावरणात साजरा करण्यात आला.

यावेळी स्व. मधुकरराव भगत शहरी व ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तसेच आजाद समाज पार्टी कां युवा जिल्हाध्यक्ष यवतमाळ - राजकुमार भगत यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना संबोधित केले.
वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठांसोबत प्रेमपूर्वक केक कापून आनंद साजरा करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांनी रित्वी ला आशीर्वाद देत तिच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, वाढदिवस हा केवळ हॉटेलमध्ये किंवा मित्रपरिवारासोबत साजरा करण्याचा दिवस नसून समाजातील ज्येष्ठांसोबत आनंद वाटण्याची संधी आहे. “येथील सर्व आजी-आजोबा आमच्यासाठी चालते-बोलते संस्कार आहेत. त्यांच्या आयुष्याचा अनुभव, संघर्ष आणि त्याग आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. माझ्या मुलीने लहानपणापासून हे शिकावे की आनंद वाटल्याने वाढतो,” असे त्यांनी भावनिक शब्दांत नमूद केले.

तसेच, “आज आम्ही येथे केवळ वाढदिवस साजरा करण्यासाठी आलो नाही, तर ज्येष्ठांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत. त्यांच्या आशीर्वादाने  रित्वी चांगली व्यक्ती बनो व समाजासाठी कार्य करणारी बनो, हीच आमची इच्छा आहे,” असेही त्यांनी सांगितले.

यावेळी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना अल्पोपहार वाटप करण्यात आले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत रित्वीला भरभरून आशीर्वाद दिले.

या अनोख्या उपक्रमातून समाजात ज्येष्ठांचा सन्मान व सामाजिक जबाबदारीचा सकारात्मक संदेश देण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या