भंडारा:-वैनगंगा नदी च्या रमणीय काठावर असलेल्या कारधा(मीरनगर)_सालेबर्डी. (सोनबर्डी)ते सिरसघाट(अजिमाबाद)चे हे मैदान भोसले काळात युद्धभुमी होते व सालेबर्डी येथे लागून असलेल्या दगडाच्या पहाडी टेकडीवर पुरातन भोसलेकालिन गंगा मातेचा मंदिर आहे.या मूर्तींची स्थापना २८०वर्षा पूर्वी राजे रघुजी भोसले यांनी केली होती. सुंदर अशी अश्वारूढ गंगा मातेची मूर्ती असून बाजूला शारदा देवी आणि समोर लोखंडी बैलगाडी आहे. येथील मैदानाच्या ठिकाणी १७३९ साली गोंड व मराठे यांच्यात घनघोर युद्ध झाले होते,जमीन रक्ताने माखल्या गेली. मराठे सेनेचे प्रमुख राजे रघुजी भोसले तर गोंड सेने चे रघुनाथ सिंग हे नेतृत्व करीत होते.राजे रघुजी भोसले हे अनेक दिवस येथे तळ ठोकून होते.सालेबर्डी येथून भोसले यांनी पहाडाच्या आडोशाने भंडारा येथील किल्ल्यावर तोफेचा भडिमार करताच किल्ल्याचा उत्तरेकडील भाग ढासळला आणि किल्ला जिंकला गेला.इ.स.१७३९ मध्ये भाणारा किल्ल्यावर मोर्चे बांधल्यावर रघुजी राजे भोसले हे तकीया येथील महान संत_वली देवबाबा व पिराशा बाबा (जिंदाशा वली) यांचे आशीर्वाद घेण्यासाठी येत असायचे.
राजे रघुजी भोसले यांनी त्या काळी या पहाडी टेकडीवर,दुसरे गोंदिया जिल्ह्यातील बोंडगाँव देवी तर नागपूर जिल्ह्यात कुही तालुक्यात अशा तीन ठिकाणी गंगा मातेच्या मूर्तीची स्थापना केली होती.असे महसूल रेकॉर्ड ला नोंद आहे.सालेबर्डी येथे गंगा मातेच्या मंदिरात पुजारी म्हणून स्व.गजभिये हे पूजा_पाठ,देखरेख करायचे. बाबा साहेबांच्या धम्म परिवर्तन मध्ये त्यांनी बौध्द धर्म स्वीकारून पुजारी पद सोडले आणि तेव्हा पासून मंदिराला कुलूप लावण्यात आले होते.माथाडी(पालगाँव)येथील मुस्लिम मालगुजार पटेल परिवारात पहिल्यांदा मुलगा झाल्याने त्यांनी मंदिर देखभाल करिता पुजारी गजभिये यांना माथाडी येथील आपली २२ एकर जागा दान म्हणून दिली होती,जी आजतागायत माथाडी येथील जमिनीची देखभाल गजभिये यांचे वंशज,कुटुंबा कडून करण्यात येत आहे.पण पुजारी गजभिये यांचे धर्म परिवर्तन मुळे मंदिरात २००८ पर्यंत पूजा_अर्चना बंद पडली होती. सन २००८ साली पुजारी चे वंशज स्थानिक दूधराम गजभिये,स्थानिक लोकप्रतिनिधी प्रशांत खोब्रागडे,वार्ताहर स्व.गोपू पिंपळापुरे,संजय एकापुरे,चैतन्य उमाळकर,विजय नीचकवडे यांच्या सहकार्याने मंदिराची डागडुजी करण्यात आली. कांची कामकोटी पिठाचे जगद्गुरु शंकाराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांनी २००८ साली मंदिरात भेट देवून त्यांच्या हस्ते मंदिराचे कपाट उघडण्यात आले व तेव्हा पासून मंदिराचे द्वार खुले आहेत.गजभिये यांचे वंशज या मंदिराची देखभाल करीत आहे. "एबीपी माझा" टीव्ही चॅनल च्या मुख्य संपादिका सरिता कौशिक यांनी ही इथे भेट देवून मंदिरा बाबद् विशेष मुलाखत प्रसारित केली होती..हे विशेष.
जुन्या काळात येथील यात्रेत नवस म्हणून दीडशे_दोनशे बकरे व बोकड यांची बळी देत असत व नवरात्री ला १० हजाराचे आसपास भाविक येथे यात्रा प्रसंगी उपस्थित राहत असल्याचे सांगतात. बोंडगाँव देवी आणि कूही (नागपूर) येथील गंगा मातेच्या मंदिरात मोठी यात्रा भरते परंतु तेच दुसरीकडे भंडारा येथून अत्यंत जवळ ३ की. मी.अंतरावर आणि गोंड_भोसले यांची ही युद्ध _भूमी असलेल्या या स्थळाला ऐतिहासिक पृष्ठभूमि व हिंदू_मुस्लिम_बौद्ध असे सामा. एकात्मतेचे त्रिवेणी संगम असे महत्त्व असून सुध्धा हे स्थळ खूप उपेक्षित व दुर्लक्षित आहे. नुकतेच ग्रीन हेरिटेज पर्यटन संस्थेतर्फे या परिसराचे निरीक्षण करून या स्थळा करिता प्रयत्न करण्यात येणार आहे. या स्थळाची पाहणी दरम्यान भंडारा पंचायत चे माजी उपसभापती प्रशांत खोब्रागडे,पुजारी चे वंशज व माजी उपसरपंच अजय गजभिये, ग्रिन हेरिटेज पर्यटन संस्थेचे संस्थापक मो सईद भाई शेख व गावकरी उपस्थित होते।


0 टिप्पण्या