भारतीय जनता पक्ष महिला आघाडीचे पोलिसांना निवेदन
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : स्थानिक बसस्थानक परिसरात विविध कामांच्या निमित्ताने महिला व जेष्ठ नागरिकांसह प्रवाशांना येणे जाणे करावे लागते. या परीसरात दारूची अनेक दुकाने आहेत. त्यामुळे या परिसरात मद्यपींचाही वावर मोठ्या प्रमाणावर असतो. या स्थानकावरून शेकडो बसफेऱ्या सुरू असतात. महिला व जेष्ठ नागरिक तथा
बाहेरगावी जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांना मद्यपींचा उपद्रव होतो. त्यामुळे सूर्यास्त झाल्यापासून शेवटची बस जाईपर्यंत पोलिस मदत केंद्र सुरु करण्यात यावे अशी मागणी महिला आघाडीने भद्रावती पोलिस स्टेशनला एका निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी भारतीय जनता पक्ष महिला आघाडी अध्यक्ष तथा नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा सभापती वृषाली पांढरे , नगरसेविका कविता सावणकर, सामाजिक कार्यकर्त्या सुलभाताई मद्दीवार, मंजुषा रॉय, डिंपल गुरूनुले, तेजश्री निवेलकर, शीला आगलावे,माधुरी ढगे, वर्षा आत्राम यांची उपस्थिती होती.


0 टिप्पण्या