चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : शहरातील चंद्रपूर - नागपूर हायवे रोड वरील सर्विस रोडवर मालवाहू वाहतूक वाहनांची मोठी रीघ लागत असल्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक टाळण्यासाठी काही वाहनचालक सर्विस रोडवर गाड्या लावत असल्याने स्थानिकांना अडचणींचा सामान करावा लागत आहे. सदर सर्विस रोडवर ट्रक व पिकअप वाहने उभी असल्याने मार्ग अरुंद झाला आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना अळथळ्यातून मार्ग काढावा लागत असून समोरून वाहून आल्यास अपघाताची शक्यता वाढत आहे. हा सर्विस रोड लहान वाहनांसाठी आणि स्थानिक येणाऱ्या - जाणाऱ्यांच्या सोयीकरीता तयार करण्यात आला होता. मात्र सध्या मोठ्या वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. तसेच सकाळी व संध्याकाळी गर्दिच्या वेळेस परिस्थिती अधिक गंभीर बनते यावेळी शाळकरी मुले, जेष्ठ नागरिक तसेच दुचाकी स्वारांना या मार्गावरुन जाताना अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. या प्रसंगी नागरिकांनी प्रशासनाकडे सर्विस रोडवरील अनधिकृत पार्किंगवर करवाई करावी, वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात आणि नियमित गस्त ठेवावी अशी मागणी संबंधित विभागाकडे केल्याची माहिती आहे.


0 टिप्पण्या