Ticker

6/recent/ticker-posts

परदेशी चा भोंगा लावलेल्या काॅंग्रेसवाल्यांनी गत २ टर्म मध्ये किती गावांचे व किती लोकांचे "कल्याण" केले ? वाढवणा गटातील मतदार बंधू-भगीणींचा सवाल...


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-सध्या सुरु असलेल्या जि.प.व पं.स.निवडणुकीची रणधुमाळी शेवटच्या टप्प्या मध्ये आली असलीतरीही प्रचाराच्या पहिल्या दिवसा पासून "तुम तो ठहरे परदेशी" असाा "भोंगा" वाजवणा-या काॅंग्रेसने गत २ टर्म मध्ये वाढवणा गटाचे प्रतिनिधीत्व केले.तेंव्हा या गटातील किती गावाचे व किती लोकांचे "कल्याण" केले?तसेच २००९ च्या लोकसभेला लातुरातुन उभा टाकलेला व जिंकलेला उमेदवार प्राॅपर लातुरचा होता का कोल्हापुरचा?असे प्रश्न वाढवणा गटातील हळी हंडरगुळी,वाढवणा,सुकणी, रुद्रवाडी,मोरतळवाडी अदी गावातील मतदारांमधून चर्चीले जातात.
वाढवणा गटात इं.काॅं.पक्ष गत २ टर्म सलग जिंकला होता.म्हणुन गत २ टर्ममध्ये सर्कल मध्ये कोणकोणत्या गावात कोणकोणते कामे केले.तसेच कुणाकुणाचे "कल्याण" केले?आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीत इं.काॅंग्रेसचा उमेदवारही "परका" होता. का?नव्हता?याचे उत्तर इं. काॅं.तर्फे जनतेला सांगणे अपेक्षीत असताना यावेळी प्रचाराच्या प्रारंभा पासूनच "तुम तो ठहरे परदेशी" चा "भोंगा" लावून स्व:ताची चुक झाकण्याचा  लाजिरवाना प्रयत्न काॅंग्रेस तर्फे होत असल्याचे दिसते. 
———————————
"परदेशी" म्हणजे नेमके कोणत्या देशाचा?याचे उत्तर आय काॅंग्रेसवाल्यांनी भरचौकात द्यावे.
BjP च्या रामचंद्र तिरुकेंना परदेशी म्हणत गटात भोंगा लावलेल्या काॅंग्रेसवाल्यांनी BjP चा उमेदवार उदगीर तालुक्याचा आहे का चीन, जपान,अमेरिकेचा आहे? याचे उत्तर द्यावे.अशी चर्चा हाळीसह वाढवणा गटात ऐकू येते.
वाढवणा हा गट ObC पुरुष असल्याने येथून BjP तर्फे गटातील नसलेतरीही जि.प.चे माजी उपाध्यक्ष तसेच गोरगरिबांचे,१८ पगड जातीधर्माचे कैवारी असलेले आणि अतीगंभीर हजारो रुग्णांना मोफत ट्रींटमेंट करुन जीवनदान दिलेले रामचंद्र तिरुके यांना उमेदवारी दिल्याने तसेच गत २ टर्म मध्ये गटातील इतर गावांचे तर नाहीच नाही.पण हाळी गावाचे ही "कल्याण" केले नसल्याने काॅंग्रेसवाल्यांची फेपडी गुंग झाली आणि तुम तो ठहरे परदेशी सह हाळीहंडरगुळी येथील मार्केट मध्ये काॅंग्रेस वाले ओरडत सुटल्याने हाळीसह गटातील इंदीरा काॅंग्रेसला चारीमुंड्या चित करण्यासाठी अन् कामाचा माणुस तसेच गंभीर,अती गंभीर रुग्णांची मोफत तपासणी करुन त्या रुग्नांना नवजीवन देणा-या विज्ञान तंञज्ञान व इंटरनेटच्या या  जमान्यातील"रामाला"म्हंजे रामचंद्र तिरुके यांना मोठ्या मताधिक्यांनी विजयी करुन जि.प.मध्ये पाठवण्यासाठी  सर्वधर्मीय मतदारबंधू तसेच लाडक्या बहिणी सज्ज आहेत.
*काॅंग्रेसवाल्यांनी गत दोन टर्म मध्ये गटातील किती गावाचे तसेच किती जनतेचे "कल्याण" केले?याचे उत्तर द्यावे.असे जयप्रकाशच्या बाकड्यावर बसलेले हाळी येथील कांहीजण बोलत होते*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या