चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-संपूर्ण भारतात महिला पतंजली योग समितीचे दिव्य नेतृत्व करणाऱ्या मुख्य महिला केंद्रीय प्रभारी, आमच्या गौरव आणि प्रेरणास्थान, श्रद्धेय पूज्य दीदी माँ साध्वी देवप्रियाजी यांचा जन्मदिन वृद्धाश्रमात फल आणि अल्पाहार वितरीत करून साजरा करण्यात आला.
महिला पतंजलीच्या केंद्रीय प्रभारी साध्वी आ. देवप्रियाजी यांच्या जन्मदिवसाच्या प्रसंगी मा. शारदा योग वर्ग आणि संत निरंकारी योगवर्गाच्या तर्फे अल्पाहार, मिठाई, बिस्किट आणि केळी वितरीत करून मोठ्या उत्साहात गुरुजनांचे आशीर्वाद घेऊन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात महिला पतंजली जिल्हा प्रभारी डॉ. वैशाली गिरीपुंजे, महामंत्री अनिता खेडीकर, योगसाधिका ललिता साखरकर, पिंकी साखरकर, चेतना कुबडे, माधुरी वाघमारे, मीना गिरीपुंजे, सारिका मानकानी आदि उपस्थित होते.


0 टिप्पण्या