विठ्ठल पाटील चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी:-"पहेले मुठ्ठीभर पैसे देकर थैलाभर शक्कर आती थी, अब थैलाभर पैसे देकर मुठ्ठीभर शक्कर आती है" या जुन्या गाण्याची आठवन सध्या जिवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर बघून येते.
आणि या वाढीव दरांमुळे गोरगरिबांच्या ताटातील वरण-भाताला महागाईची फोडणी बसल्याने अनेकांचे मंथली बजेट शेअर मार्केट प्रमाणे कोसळले आहे.
राजवाड्यात राहणारे असो किंवा झोपडीत.या सर्वांच्या ताटात वरण-भात हमखास असतोच असतो.आणि हे अन्नपदार्थ बनविण्यासाठी आवश्यक असलेल्या डाळी आणि तांदळांचे सध्याचे दर गरिबांसह मध्यमवर्गीयांच्या पाॅकेटच्या बाहेर गेले आहे.
हंडरगुळी(ता.उदगीर)येथील किराणा,भुसार बाजारात सर्व प्रकारच्या डाळी तसेच तांदुळ आणि गोडतेल यांचे दर गरिबांच्या हाताबाहेर गेल्याने वरण-भाताची टेस्ट बेचव झाली आहे.भविष्यात दरात उतार नाही झाल्यास गरिबांच्या चुलीवर वरण— भात शिजणे मुश्किल आहे.
२०२५ मध्ये पडलेल्या अति धुआंधार पावसामुळे खरीप हंगामातील मुग,उडीद,तुर या डाळवर्गीय पिकांचे मोठे नुकसान झाले.परिणामी या डाळींचे उत्पादन घटले अन् बाजारात डाळींच्या दराने कधीच शंभरी ओलांडली.
डाळवर्गीय शेतमालांची देशांतर्गत मार्केट मध्ये मोठी मागणी वाढली असून यात मुग,उडीद व तुरीला अधिक म्हत्व आहे.आणि याचा थेट परिणाम डाळींच्या दरावर झाला आहे.आणि आगामी काळात डाळींच्या किंमतीत पुन्हा वाढ होऊ शकतो.असे व्यापारी ओमकार काळवणे यांनी सांगितले.
येथील बाजारपेठेत डाळीं सह तेल,तांदुळ यांचे दर खालील प्रमाणे आहेत.
सोयाबीन तेल पुडा-१३५ ₹ रुचीपाम तेल पुडा-११० ₹
पाॅलिश तुर डाळ-१४० ₹
गावरान तुर डाळ-१३० ₹
तांदुळ-६० ₹ पासून १५० ₹
मुग डाळ-१२० ₹ किलो
उडीद डाळ-१२० ₹ किलो असे आजचे दर आहेत.
अशी माहिती किराणा दुकाणदार बालाजी माने यांनी दिली.
वाढती महागाई गरीबांना जगू देईना व मरुही देईना. तेंव्हा सब का साथ,सबका विकास म्हणजे वाढलेली महागाई तर नाही ना?अशी शंका आम्हा गरीबांना आहे.
पद्मीनबाई कांबळे,मजुर भगीनी..


0 टिप्पण्या