Ticker

6/recent/ticker-posts

कुटुंबातील एक तरी व्यक्ती देशसेवेसाठी द्या”-सुभेदार महेंद्र गवई

प्राचार्य डॉ. नंदकुमार पाटील राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर :-सामाजिक कार्य हीच खरी देशसेवा समजून प्रत्येक कुटुंबाने देशहितासाठी किमान एक तरी व्यक्ती पुढे करावी असे प्रेरणादायी विचार सुभेदार महेंद्र गवई यांनी व्यक्त केले.
 पुरस्काराने प्रेरणा मिळते आणि त्याच प्रेरणेतून राष्ट्र घडते, असा मोलाचा संदेशही त्यांनी या वेळी बोलताना उपस्थितांना दिला.
साऊ ज्योती सामाजिक संस्था, श्लोक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २०२६ चा राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार सोहळा पुण्यातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात नुकताच उत्साहात व थाटात पार पडला.

आयोजित सोहळ्यात देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालय, मोहोळचे प्राचार्य डॉ. नंदकुमार पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य पुरस्कार सुभेदार महेंद्र गवई यांच्या हस्ते बहाल करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. शंकर अंदानी होते.तर याच कार्यक्रमात प्रमुख आकर्षण म्हणून सिने अभिनेते बाळराजे वाळूजकर आणि चित्रा दीक्षित प्रामुख्याने उपस्थित होते.
 मार्गदर्शक म्हणून प्रा. धाराशिव शिरोळे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

 पुरस्कार समारंभाला पोलीस उपनिरीक्षक ब्रह्मदेव देशमुख, पोलीस सब-इन्स्पेक्टर विष्णु देशमुख, मुख्य तपासणी अधिकारी (मुंबई) रामजीत गुप्ता, संदीप शर्मा, दीपक बडगुजर, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्त्रीरोगतज्ञ व समाजसेविका डॉ. प्रिया देशमुख,  सुशीलदत्त बागडे, संस्थेचे उपाध्यक्ष विकास उबाळे तसेच श्लोक फाउंडेशनचे अध्यक्ष रंगाशाही बेजगावकर आदिं मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक भाषण संस्थाध्यक्ष सचिन हळदे यांनी केले तर कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन ॲड. उमाकांत आदमाने व  कवयित्री पूजा आशा दिलीप पाटील यांनी केले. कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदैव स्मरणात राहावा असा हा पुरस्कार समारंभ अनेकांच्या उपस्थितीत पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या