चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी :-९ फेब्रूवारी रोजी वाढवणा गटातून विजयी झालेले राम भाऊ तिरुके व हंडरगुळी गणातून विजयी झालेले विक्की भोसले यांनी दि.११ रोजी सा.बां.व पालकमंञी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी वाढवणा गट काॅंग्रेसमुक्त करुन प्रथमच वाढवण्यात भाजपचा झंडा फडकावलेल्या रामभाऊ तिरुके व विक्की भोसले यांचे राजेंनी स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.
तसेच जि.प.गटातील विकास कामांची माहिती दिली व घेतली.
नुकत्याच संपलेल्या जि.प. निवडणुकीत वाढवणा गटा मध्ये प्रथमच भाजपचा झंडा फडकावला आणि वाढवणा गट काॅंग्रेसमुक्त केल्याबद्दल राजेंनी राम तिरुके यांचे विशेष कौतूक तसेच अभिनंदन केले.
यावेळी आ.संजय बनसोडे हे ही आवर्जुन उपस्थित होते.
"राम" गेला "राजां"च्या भेटीला, असे म्हटले तर चुकीचे होणार नाही.


0 टिप्पण्या