Ticker

6/recent/ticker-posts

परमपूज्य श्री सद्गुरु मारोती महाराज यांचा प्रगट दिन भक्तिभावाने केला साजरा


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती :  विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्याच्या हडस्ती गावात एका छोट्याशा  गरीब कुटुंबात नाभिक समाजातील 
अवतरणारे महान संत परमपूज्य श्री. मारोती महाराज यांचा  प्रगट दिन सोहळा सोमवार, दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
दरवर्षी या पावन सोहळ्यासाठी विदर्भातील विविध जिल्हे व तालुक्यांतून हजारो भाविकांची उपस्थिती दर्शवली होती. यानिमित्ताने यावर्षीही सुमारे दहा हजार भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
हा सोहळा केवळ नाभिक समाजापुरता मर्यादित नसून, सर्व समाजातील बांधव मोठ्या श्रद्धेने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. नाभिक समाजात जन्म घेऊन संपूर्ण समाजाला आध्यात्मिक दिशा देणारे श्री सद्गुरु मारोती महाराज हे समाजासाठी अभिमानाचा विषय आहेत.
हा प्रगट दिन सोहळा म्हणजे श्रद्धा, सेवा, एकता आणि संस्कारांचे जिवंत प्रतीक असून, मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.
या पावन सोहळ्यास हजारो समाज बांधव भाविकभक्तांनी दर्शन घेतले होते. या कर्यक्रमाला  जय जिवाजी क्रांती सेना, महाराष्ट्र राज्य (चंद्रपूर) चे गणेश वानकर विशेष प्रामूख्याने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या