Ticker

6/recent/ticker-posts

पहेला येथील माजी जि.प.सदस्या यामिनीताई सुरेश बांडेबुचे युरोप दौऱ्यावरून शेतकरी अभ्यास करून परतल्यावर पत्रकार संजीव भांबोरे यांनी त्यांच्या स्वगृही दिली सदिच्छा भेट


विदेश  दौऱ्यात त्यांनी फ्रान्स, स्विझर्लंड, नेदरलँड ,जर्मनी या देशांना भेटी दिल्या


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा -तालुक्यातील पहेला येथील माजी जिल्हा परिषद सदस्या यामिनीताई सुरेश बांडेबुचे यांची आज दिनांक 3 मार्च 2026 ला पत्रकार संजीव भांबोरे यांनी त्यांच्या घरी सदिच्छा भेट घेऊन युरोप दौऱ्यावरून शेतकरी अभ्यास करून स्वगृही परत आल्यावर त्यांना युरोप दौऱ्यात जे अनुभव आले याबाबत भेट घेतल्यानंतर विविध प्रश्नावर चर्चा केली. विदेश दौऱ्यात त्यांनी फ्रान्स , स्विझर्लंड,नेदरलँड, जर्मनी, या देशांना भेटी दिल्यानंतर कोणता अनुभव आला अशा प्रकारे प्रश्न उपस्थित केला असता त्यांनी आम्ही 19 फेब्रुवारीला शिवजयंती असताना महाराष्ट्राची संस्कृती व इतिहासाची परंपरा कायम ठेवून शिवजयंती साजरी केली . प्रमाणे फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे अत्याधुनिक बकरी व गायीच्या दूध प्रकल्पाला भेट दिली. फ्रान्समध्ये द्राक्ष प्रक्रिया व सेंद्रिय शेती यांना भेट दिली. बायोगॅस व दुग्ध डेअरी यांनाही भेट दिली. नेदरलँड मधील फुलबागांच्या व्यवसायाबद्दल त्यांनी माहिती दिली .त्याचप्रमाणे फ्रान्समधील आयफेळ टॉवर्स याबाबत पत्रकारांना माहिती दिली व आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीमुळे उत्पादनात वाढ होऊन शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम कसं होईल याबाबत माहिती दिली. यावेळी सनराईज कम्प्युटरचे संचालक विलास बांडेबुचे,सामाजिक कार्यकर्ते कुलदीप गंधे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या