Ticker

6/recent/ticker-posts

जि. प. शाळेच्या शालिनी राऊत पोस्ट ऑफ द विनर पुरस्काराने सन्मानित

चित्रा न्युज प्रतिनिधी 
.साकोली:-पंचायत समिती साकोली अंतर्गत विद्यार्थी गुणवत्ता विकास व मिशन स्कॉलरशिप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात स्थानिक गणेश वॉर्ड स्थित जिल्हा परिषद वरिष्ठ केंद्रीय प्राथमिक शाळा क्रमांक १ येथील अष्टपैलू सहाय्यक शिक्षिका शालिनी राऊत ( काळसर्पे )  यांना पोस्ट ऑफ द विनर  ( क्लब लेवल ) या पुरस्काराने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. भंडारा जिल्हा परिषद आणि साकोली पंचायत समिती साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने जमनापूर येथील नवजीवन विद्यालयात विद्यार्थी गुणवत्ता विकास कार्यक्रम व साकोली मिशन उपक्रम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. साकोली पंचायत समितीचे सभापती डॉ. ललित हेमणे तर प्रमुख पाहुणे म्हणून खंडविकास अधिकारी पी. व्ही. जाधव, गटशिक्षणाधिकारी विजय आदमने, उपसभापती करूणा वालोदे, पं. स. सदस्य तथा सेवानिवृत्त प्राचार्य होमराज कापगते, अनिल किरणापूरे, सरीता करंजेकर, छाया खर्डेकर, पंचायत समिती सदस्य क्रिष्णा कोयडवार, केंद्र प्रमुख यादवकांत ढवळे, मुख्याध्यापक सेवकराम हटवार, साकोली केंद्रप्रमुख अ. ब. मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यातील सुमारे ७०० शाळांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. "ओएलएफ" चा ‘विनोबा’ कार्यक्रम सध्या भंडारा जिल्ह्यातील ७९४ शासकीय शाळांमध्ये सक्रिय असून ५७,००० हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम अंतर्गत संस्था ४ राज्यांतील ६० हजार शाळा व ४० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी तंत्रज्ञान आणि वर्तनशास्त्राच्या माध्यमातून कार्यरत आहेत. या शाळांतील विद्यार्थ्यांना विशेष सन्मानित करण्यात आले. यात साकोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या सहाय्यक शिक्षिका शालिनी राऊत यांचाही समावेश होता. सदर पुरस्कार कार्यक्रम समारंभात जि. प. उच्च प्राथ. शाळा पिटेझरी, जि. प. माध्य. शाळा गोंडउमरी, जि. प. माध्य. शाळा पळसपाणी, जि. प. उच्च प्राथ. शाळा किन्ही/मोखे, जि. प. केंद्रीय उच्च प्राथ. शाळा साकोली क्र. (१) ,जि. प. उच्च प्राथ. शाळा पिंडेकेपार या शाळांचा समावेश आहे. नन्हे सितारे उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या कौशल्यांचा विकास करण्याची आणि आत्मविश्वासाने मंचावर उभे राहण्याची संधी मिळाली असून भविष्यातही अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल असा विश्वास मान्यवरांनी  व्यक्त केला. या कार्यक्रमाचे संचालन वैशाली नगराळे यांनी केले.  गणेश वॉर्ड जिल्हा परिषद शाळेच्या सहाय्यक शिक्षिका शालिनी राऊत (काळसर्पे ) यांना विशेष पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हेमंत भारद्वाज, संपूर्ण शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक सेवकराम हटवार, शिक्षक शिक्षिका वृंद टी. वाय. पटले, ज्ञानेश्वर माहूरले, चेतन बोरकर, श्रद्धा आवटी, चित्रलेखा इंगळे, गहाणे, स्वयंसक शिक्षिका आरती कापगते यांनी विशेष अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या