चित्रा न्युज प्रतिनिधी
.साकोली:ग्रामीण भागामध्ये एक अस्सल ग्रामीण म्हण वापरली जाते ती अशी की, " काम झाला मजा अन् का करू तुझा ? ही म्हण व्यक्तीच्या बाबतीत जरी वापरण्यात येत असली तरी कधी कधी एखाद्या प्रकाराच्या बाबतीतही म्हण लागू होत असते.
सध्या ही म्हण राष्ट्रीय महामार्ग म्हणजे हायवेच्या बाबतीत लागू होत आहे. हायवेचे बांधकाम झाल्यानंतर या विभागाने राष्ट्रीय महामार्गावर लाईट लावले. ते सुरूही झाले मात्र त्यानंतर बंद असलेल्या विद्युत दिव्याकडे डोळे झाक केले. एकीकडे सकाळी जिथे लाईट बंद करायची असते तिथे चक्क सुरू राहतात आणि जिथे लाईट सुरु करण्याची गरज आहे तिथे मात्र दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे. जांभळी हायवे मार्गावर सध्या हा प्रकार दिसून येत आहे. गेल्या महिन्या भरापासून जांभळी राष्ट्रीय महामार्गावर विद्युत दिव्य बंद आहेत. परंतु याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. विशेष म्हणजे रात्री हायवेवरील सुरक्षितता जपणारे एक वाहन रात्री आणि पहाटे गस्त घालीत असते. परंतु त्यांच्या लक्षात ही बाब येऊ नये याचे मात्र नवल वाटते. रात्रीच्या वेळी प्रवास करतांना अशावेळी अंधारामुळे वाहन चालकांना त्रास होतो. या दरम्यान पाऊस असल्यास हायवेवर साचलेले पाणी दिसून येत नाही. दिव्य बंद असल्याने त्यामुळे अपघात संभवतो. त्यामुळे त्वरित हे दिव्य सुरू करण्याची मागणी हायवेवरून रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केलेली आहे.


0 टिप्पण्या