Ticker

6/recent/ticker-posts

विदर्भ पटवारी संघ,नागपूर उपविभाग शाखा राजुराच्या अध्यक्षपदी किशोर कुलकर यांची सलग पाचव्यांदा अविरोध निवड

 

चित्रा न्युज प्रतिनिधी 
 चंद्रपूर:-विदर्भ पटवारी संघ नागपूर ,उपविभाग शाखा राजुराची  वार्षिक आमसभा नुकतीच पटवारी भवन, राजुरा येथे उत्साहात संपन्न झाली. या सभेत अध्यक्षपदी किशोर कुलकर यांची सलग पाचव्यांदा सर्वानुमते अविरोध निवड झाली.
सभागृहातील सर्व सदस्यांनी एकमुखाने कुलकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत त्यांना पुन्हा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. त्यांच्या मागील कार्यकाळात संघटनेने महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करून संघटनेची ताकद वाढविली, असे मत अनेकांनी आपल्या बोलण्यातून यावेळी व्यक्त केले.
सन २०२६–२०२७ या वर्षाकरिता नूतन कार्यकारिणीची सर्वसंमतीने पुढीलप्रमाणे निवड करण्यात आली. अध्यक्ष किशोर कुलकर, उपाध्यक्ष कु. पूजा टेकाम, सचिव चेतन चेन्नुरवार, सहसचिव अजय गेडाम, कोषाध्यक्ष सागर कोडापे कार्यकारिणी सदस्यांत 
सतीश मिटकर, लक्ष्मीकांत मासिरकर, अनिल पेंदोर, प्रवीण गंधमवर, भिमराव सावळे, प्रिया सिडाम यांचा समावेश करण्यात आला.
जिल्हाध्यक्ष  विशाल चांदेकर, जिल्हा सचिव  शैलेश दुवावार, सुनिल रामटेके, निरंजन गोरे, विनोद गेडाम तसेच उपस्थित मान्यवरांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
“संघशक्ती कलियुगे!” या घोषणांनी सभागृह दणाणून गेले होते. संघटनेचे कार्य अधिक प्रभावी व गतिमान करण्याचा निर्धार यावेळी प्रत्येकांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात चंद्रपूर जिल्हा पटवारी संघटनेचे अध्यक्ष विशाल चांदेकर, सेवानिवृत्त मंडळ अधिकारी 
ह. वा.अंदनकर, मंडळ अधिकारी निरंजन गोरे, सेवानिवृत्त मंडळ अधिकारी सुनिल रामटेके,  सेवानिवृत्त मंडळ रविन्द्र खोब्रागडे सेवानिवृत्त तलाठी सुर  यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. 
       कार्यक्रमाचे संचालन सागर कोडापे तर आभार प्रदर्शन अनिल पेंदोर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या