सुनिल रामटेके यांनी त्यांच्या निवडिचे केले स्वागत
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : नुकताच नागपूर महानगरीत दिनांक २२/२/२०२६ रोजी "बाप" फाऊंडेशन तर्फे, तथा सामाजिक संस्था प्रतिनिधी चिंतन बैठक, नागपूर येथील रवी भवन सिव्हिल लाइन नागपूर येथे विभागीय स्तरावर माहितीचा अधिकार कार्यकर्ताची निवड सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये विनोद खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते वरोरा यांची चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पदावर एकमताने निवड करण्यात आली,भारतीय संविधानाची फोटो प्रत, सन्मान चिन्ह, गौरव प्रमाणपत्र,व माहीतीचा अधिकाराचे पुस्तक लोखंडे "बाप" फाऊंडेशनचे अध्यक्ष, मुंबई, डि.वाय.एस.पी. पुरुषोत्तम चौधरी तथा ऍन्टी करप्शन ब्युरेचे सेवावृत्त नागपूर, तसेच नायब तहसीलदार लांजेकर सेवावृत्त भंडारा , सुरेश दुरुगकर गोंदिया व विठोबा ध्यानधन नाशिक , शंकर सलोडकर व इतर पदाधिकारी यां मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यत आले.
दरम्यान राजुरा येथील सेवानिवृत्त मंडळ अधिकारी सुनिल रामटेके यांनी यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.


0 टिप्पण्या