•पोहरा येथील प्रकार
•पोलीस निरीक्षक लाखनी यांचेकडे येथे तक्रार
चित्रा न्युज प्रतिनिधी
लाखनी:- तालुक्यातील पोहरा ग्रामपंचायतीच्या कार्यालयीन गोल शिक्का तसेच ग्रामपंचायत अधिकारी(सचिव) यांचे अज्ञात व्यक्तीने बनावट रबरी शिक्के तयार करून खोटे दाखले देणाऱ्यांची चौकशी करण्यात यावी याकरीता प्रशासक रामलाल पाटणकर व ग्रामपंचायत अधिकारी नरहरी बारस्कर यांचे स्वाक्षरीची पोलीस निरीक्षक लाखनी यांचेकडे तक्रार करण्यात आली असल्याचे प्रशासक रामलाल पाटणकर यांनी पत्रपरिषदेत सांगितले.पोलिसांकडून काय कारवाई केली जाते याकडे ग्रामवासी जनतेचे लक्ष लागले आहे.
गिता दशरथ कावडकर रा.खापरी यांनी मिरा धुमेन्द्र भोंगाडे यांचा मृत्यू दाखला मिळण्याकरिता ग्रामपंचायत कार्यालय पोहरा येथे ६ मार्च २०२६ रोजी अर्ज केला होता व अर्जासोबत मीरा भोंगाडे हिच्या १० डिसेंबर २०१५ च्या मृत्यू दाखल्याचे झेरॉक्स प्रत दिली होती.तसेच मालमत्ता क्रमांक- ३३४ चे प्रमाणपत्र व चतु:सिमा जोडलेले कागदपत्र मोतीलाल ओसवाल यांनी गृहकर्जसाठी दिलेले दस्तऐवज ९ मार्च २०२६ ला पडताळणीसाठी पाठविले असता खोटे असल्याचे ग्रामपंचायतच्या निदर्शनास आल्याने तो खोटे दाखले देणारा इसम कोण? याचा शोध घेऊन कारवाई करण्याकरिता प्रशासक रामलाल पाटणकर व ग्रामपंचायत अधिकारी नरहरी बारस्कर यांनी पोलीस निरीक्षक लाखनी यांचेकडे तक्रार केली असून उपमुख्य कार्यकारी जी.प. भंडारा, तहसीलदार लाखनी, गटविकास अधिकारी प.स.लाखनी यांना प्रतिलिपी पाठविण्यात आल्या असल्याचे प्रशासक रामलाल पाटणकर यानी पत्रपरिषदेत सांगितले. या गंभीर बाबींवर पोलीस विभाग, तालुका प्रशासन व पंचायत समिती प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते याकडे पोहरा ग्रामवासी जनतेचे लक्ष लागले आहे.


0 टिप्पण्या