चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा :-दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नववर्षाच्या पूर्व संध्येला स्थानिक बस स्थानकावर संस्कार भारतीच्या भूअलंकार विधेने भव्य रांगोळी काढून आपला 26 वर्षापासून चा उपक्रम पूर्ण केला.
अतिशय उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात बस स्थानकावर भव्य रांगोळी साकारण्यात आली. यातील सहभागी कलाकार होते रूपाली निर्वाण, शालिनी बाळबुदे, विशाखा गाणार, सीमा देव्हारे, रेखाबाई निखाडे, जया कडियम, करुणा शेंडे, अनिता चौधरी , आशिता मुरकुटे, माया बोरकर, लता मसुलकर, ज्ञानेश्वर चौधरी.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आम्हाला संस्कार भारती कार्यकारणीतील प्रा. सुमंत देशपांडे ,श्री. दत्ता दाढी डॉ.अश्विनी व्यवहारे केशव जोशी , मोहन भाकरे ,सईद शेख सर, चंदा मुरकुटे .अनघा चेपे, नीता मलेवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


0 टिप्पण्या