Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष श्री. अॅड. वसंतराव मनकर यांचे १६ मार्च ला भंडारा जिल्हयात आगमण

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा : दिनांक १६ मार्च २०२६ रोज सोमवार ला सकाळी ११.०० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष श्री. अॅड. वसंतराव मनकर यांचे भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यालय तिलक वार्ड, भंडारा येथे आगमन होणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री. नाना पंचबुध्दे प्रदेश महासचिव श्री. धनंजय दलाल, राज्य समन्वयक सरचिटणीस डॉ. मंगेश देशमुख व संपर्क प्रमुख सरचिटणीस डॉ. गणेश डोंगरे उपस्थित राहणार आहेत. करीता जिल्हयातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बंधू यांच्याशी भेट घेऊन चर्चा करणार आहेत. तरी भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सर्व सेलचे अध्यक्ष, नगर परीषद भंडाराचे आजी व माजी नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, बुथ कमिटीचे प्रमुख व सदस्य यांनी या बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री. नाना पंचबुध्दे व किसान सभेचे जिल्हाध्यक्ष श्री. धनराज चौधरी यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या