Ticker

6/recent/ticker-posts

भिलारवाडी विद्यालयात मा आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांना विनम्र अभिवादन-------------------


चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर:-भिलारवाडी विद्यालय भिलारवाडी ता .करमाळा येथे मा.आमदार कार्यतपस्वी काकासाहेब साळुंखे पाटील यांचा पुण्यस्मरण दिन साजरा करण्यात आला.प्रारंभी काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक व मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक येडे सर हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक अविनाश भालशंकर सर हे होते. मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक रामचंद्र उबाळे सर यांनी शिक्षणाची गंगा भिलारवाडी सारख्या ग्रामीण भागात  पोहोचवून शिक्षणापासून वंचित घटकांना संस्थेने न्याय दिला.आज हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन चांगल्या पदापर्यंत गेले आहेत.या पुढे ही शाळा चांगले गुणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न करत असलेबाबत सांगितले.अध्यस्थानावरून येडे सर यांनी मा .काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या कार्याची माहिती दिली.या वेळी शिक्षक कैलास फरतडे,जगताप सर,माने मॅडम,ज्योत्स्ना क्षीरसागर मॅडम सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी ,पालक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या